'गोदरेज इंटिरिओ'ने सादर केली 'पोश्चर परफेक्ट' करणारी खुर्ची..
'गोदरेज इंटिरिओ'ने सादर केली 'पोश्चर परफेक्ट' करणारी खुर्ची;
खुर्चीच्या डिझाइनमध्ये क्रांतिकारी सुधारणा
ü 'पोश्चर परफेक्ट' ही आहे जगातील सर्वात प्रगत खुर्ची; कोणत्याही स्थितीत खुर्चीत कलून बसले, तरी शरीराला व्यवस्थित टेकू देणारे डिझाईन
ü खुर्चीच्या 'ट्रॅकबॅक' तंत्रज्ञानाचे जागतिक स्तरावर तेराहून अधिक देशांमध्ये पेटंट
मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३ : फर्निचर आणि गृहसजावट क्षेत्रात भारतात आघाडीवर असणाऱ्या गोदरेज इंटिरिओ या ब्रँडतर्फे 'पोश्चर परफेक्ट' या नावाची व तशा डिझाईनची खुर्ची सादर केली असून आपल्या ऑफिस वेलनेस उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. 'गोदरेज इंटिरिओ'ने या खुर्चीच्या प्रगत डिझाईनचे, तिच्या अनोख्या "ट्रॅकबॅक" तंत्रज्ञानाचे १३ देशांमध्ये पेटंट घेतले आहे. या खुर्चीत आरामात कलून बसलेल्या स्थितीतदेखील आपल्या शरीराच्या सर्व भागांना व्यवस्थित टेकू मिळतो. कार्यालयीन कामाच्या ठिकाणी 'गोदरेज इंटिरिओ'चे हे उत्पादन क्रांतिकारी ठरणार आहे. गोदरेच समुहातील 'गोदरेज अँड बॉयस' या कंपनीचा गोदरेज इंटिरिओ हा एक व्यवसाय आहे.
मानव-केंद्रित दृष्टीकोन आणि अडॅप्टिव्ह स्पेस सोल्यूशन्सवर आधारित डिझाइन तयार करण्याचे 'गोदरेज'चे तत्त्व यातून पुढे येते. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये 'वेलनेस सीटिंग सोल्यूशन्स' ही श्रेणी ५० टक्क्यांनी वाढण्याची कंपनीला अपेक्षा आहे आणि 'पोश्चर परफेक्ट चेअर' श्रेणीमुळे त्यात १० टक्के भर पडेल, असा कंपनीचा अंदाज आहे. प्रतिष्ठित डिझायनर जिमी उनवाला यांनी या खुर्चीची रचना केली आहे. 'गोदरेज अँड बॉयस'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज, 'गोदरेज अँड बॉयस'चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वर्मा, 'गोदरेज इंटिरिओ'चे वरिष्ठ उपप्रमुख व व्यवसाय प्रमुख स्वप्निल नगरकर आणि 'गोदरेज इंटिरिओ'चे विक्री व विपणन (बी-टू-बी) या विभागाचे वरिष्ठ उपप्रमुख समीर जोशी यांच्या उपस्थितीत या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले.
कार्यालयात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खुर्चीत बसून अवघडलेपणा येतो व त्यातून त्यांना शारिरीक व्याधींना तोंड द्यावे लागते. या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने 'गोदरेज इंटिरिओ'मध्ये सतत संशोधन सुरू असते. या ब्रॅंडतर्फे घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की कार्यालयात एकाच जागी तासनतास बसून काम करण्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी स्नायू, सांधे, मणका यांच्याशी संबंधित व्याधींनी ग्रस्त आहेत. तसेच सुमारे ६७ टक्के कर्मचारी दिवसातील १० ते ११ तास एकाच जागी बसून राहतात आणि त्यामुळे त्यांना पाठदुखीची व्याधी जडण्याचा धोका असतो. 'गोदरेज इंटिरिओ'कडे निरोगी जीवनशैलीचा अभ्यास असणारे डॉक्टरांचे एक अनुभवी पथक आहे आणि ते कॉर्पोरेट्सना या संदर्भात सल्लासेवा देऊ शकते. 'गोदरेज इंटिरिओ'ने उंची कमी-जास्त करता येतील असे डेस्क, विशिष्ट पद्धतीने आरामदायी ठरणाऱ्या खुर्च्या अशी अनेक उत्पादने सादर केली आहेत. 'पोश्चर परफेक्ट चेअर' ही याच मालिकेतील नवीन खुर्ची आहे.
कर्मचार्यांच्या निरोगीपणाविषयी बोलताना 'गोदरेज अॅंड बॉयस'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज म्हणाले, “लोकांच्या राहणीमानात प्रगती साधण्याच्या उद्देशाने आम्ही गेल्या १२६ वर्षांपासून कार्यरत आहोत. कार्यालयीन कामकाजात उत्पादकता यावी याकरीता कर्मचाऱ्यांच्या बसण्याच्या पद्धतीत अर्गोनॉमिक स्वरुपाचे डिझाइन आवश्यक आहे. काम करीत असताना निरोगीपणा जपणे हा कोणत्याही डिझाईनमधील एक महत्त्वाचा निकष असायला हवा. त्यातूनच कर्मचारी तंदुरुस्त राहू शकतील. कामाच्या ठिकाणी अर्गोनॉमिक डिझाइन आणि आरामाची गरज लक्षात घेऊनच 'गोदरेज'ने खुर्च्यांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपाय योजले आहेत. पोश्चर परफेक्ट या खुर्चीमध्ये बसण्याच्या प्रत्येक स्थितीसाठी डिझाइनची अर्गोनॉमिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये उत्कृष्ट व हरीत डिझाइनची संकल्पना मांडत असतो आणि पोश्चर परफेक्ट खुर्ची ही या संकल्पनेचे एक ठळक उदाहरण आहे."
खुर्चीत कललेल्या अवस्थेत बसूनदेखील पाठीला व्यवस्थित आधार मिळेल, अशा रितीने 'पोश्चर परफेक्ट चेअर'चे डिझाइन करण्यात आलेले आहे. बीआयएफएमए या संघटनेने घातून दिलेल्या कठोर चाचणी मानकांची पूर्तता करून मजबूत आणि टिकाऊ पद्धतीने ही खुर्ची बनविण्यात आली आहे. या खुर्चीला 'ग्रीनगार्ड'सारखी जागतिक प्रमाणपत्रे मिळाली आहेत. नितळ आणि सुरेख आकाराच्या पोश्चर परफेक्ट चेअरचे डिझाईन अतिशय आकर्षक आहे. वापरकर्त्यांची पसंती, कार्यालयातील सजावट आणि वैयक्तिक शैली यांनुसार ती २४ वेगवेगळ्या प्रकारे सानुकूलित करता येते. तीन प्रकारांमध्ये तिची अपहोल्स्ट्री देण्यात आली असून त्यांतही प्रत्येकी चार रंगांमध्ये निवड करता येते. हे सर्व प्रकार आणि रंग यांच्यामुळे ही खुर्ची पारंपरिक ते समकालीन असा विस्तृत पट व्यापते. त्यामुळे 'पोश्चर परफेक्ट' ही ऑफिस स्पेस, इंटीरियर आणि आर्किटेक्चर या सर्वांमध्ये एक सुसंगती निर्माण करते.
'गोदरेज इंटिरिओ'चे वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख स्वप्निल नगरकर म्हणाले, “गेल्या ३ वर्षांत, 'गोदरेज इंटिरिओ'ने आरोग्य आणि टिकाऊपणा यांवर लक्ष केंद्रित करून कार्यालयांमधील वापरासाठी अनेक उत्पादने सादर केली आहेत. आमच्या वार्षिक उत्पनाच्या १८ टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न हे या विभागातील नवीन उत्पादनांमधून येते. कार्यालयीन खुर्च्यांच्या क्षेत्रात आमचा बाजारपेठेतील हिस्सा १४ टक्के इतका आहे. ग्राहकांचा प्राधान्यक्रमाचा ब्रँड म्हणून आमची वाटचाल सुरू आहे, ती कायम ठेवून आर्थिक वर्ष २५पर्यंत हा हिस्सा १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आमची योजना आहे. पोश्चर परफेक्ट चेअर ही श्रेणी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर संबंधित उद्योगात क्रांती घडवून आणेल. खुर्चीवर बसून बराच वेळ काम करावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसण्याच्या कोणत्याही स्थितीत आराम व व्यवस्थित टेकू मिळावा या दृष्टीने ही खुर्ची आदर्श आहे. ही जगातील सर्वात प्रगत खुर्च्यांपैकी एक आहे आणि आमच्याकडे अमेरिका व युरोपसह १३ देशांमध्ये तिच्या संदर्भात पेटंट आहेत. आम्ही ही खुर्ची जागतिक बाजारपेठेत सादर करण्याचा विचार करीत आहोत."
'गोदरेज इंटिरिओ'ची वेबसाइट आणि स्टोअर्स यांच्या माध्यमातून 'पोश्चर परफेक्ट' ही उत्पादन श्रेणी संपूर्ण भारतात उपलब्ध असेल. तिची किंमत ५० हजार ते ९० हजार या घरात आहे.
Comments
Post a Comment