इंडियन टेरेन फेअरट्रेड कॅप्‍सूल कलेक्‍शनसह स्थिर हाय स्ट्रिट फॅशनमध्‍ये अग्रस्‍थानी

 

  • फेअरट्रेड कापसापासून बनवण्‍यात आलेली उत्‍पादन रेंज निर्माण करणारा भारताचा पहिला हाय स्ट्र ब्रॅण्‍ड
  • इंडियन टेरेनने फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केल्यामुळे भारतीय कापूस उत्‍पादक शेतक-यांना त्‍यांच्‍या उत्‍पादनांसाठी बाजारपेठ मिळण्‍याची आणि योग्‍य मूल्‍य मिळण्‍याची खात्री मिळते
  • ्थिर फॅशन रेंज ऑफर करण्‍यासाठी भारतातील पहिल्‍या हाय स्ट्रिट ब्रॅण्‍डचा फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग
  • पुढील तीन वर्षामध्‍ये स्थिर व जबाबदारपूर्ण पुरवठा साखळीच्‍या माध्‍यमातून ५० टक्‍क्‍यांहून अधिक ब्रॅण्‍डचे कलेक्‍शन सोर्स करण्‍याप्रती कटिबद्ध

मुंबई, २० ऑक्‍टोबर २०२०: वर्षानुवर्षे स्थिर व जबाबदारपूर्ण ग्राहक ब्रॅण्‍ड्सना त्‍यांच्‍या पुरवठा साखळीमध्‍ये पारदर्शकता व स्थिरता दर्शविण्‍याप्रती प्रोत्‍साहित करत आहेत.

ग्राहकांना दर्जात्‍मक उत्‍पादने देण्‍याच्‍या २० वर्षांच्‍या कटिबद्धतेला कायम राखण्‍यासोबत देशाच्‍या प्रबळ राष्‍ट्रीय ब्रॅण्‍ड्स निर्माण करण्‍याच्‍या मागणीला आवाज देत भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे. ही रेंज पर्यावरणाचे संरक्षण करते आणि गुजरातमधील फेअरट्रेड शेतक-यांना सक्षम करते.

फॅशनची सामाजिक व पर्यावरणीय उपस्थिती व्‍यापक होत असताना ब्रॅण्‍ड्ससाठी परिवर्तनाला चालना देणे देखील तितकेच महत्त्वाचे बनले आहे. इंडियन टेरेन स्थिर फॅशनला अधिक मुख्‍य प्रवाहात आणण्‍याची भूमिका जाणते. फेअरट्रेड कॅप्‍सूल कलेक्‍शन सादर करण्‍यासाठी भारताचा पहिला हाय स्ट्रिट ब्रॅण्‍ड बनण्‍याप्रती कटिबद्धता याच दिशेने एक पाऊल आहे. इंडियन टेरेनद्वारे फेअरट्रेड लेबल असलेले कलेक्‍शन/कॅप्‍सूलचा अर्थ म्‍हणजे कलेक्‍शन/कॅप्‍सूल बनवणारी शेती व कारखान्‍यांमध्‍ये सामाजिक व पर्यावरणीय स्थिरता दर्जांचे पालन करण्‍यात आले आहे. तसेच याचा अर्थ असा कीशेतक-यांना त्‍यांच्‍या उत्‍पादनासाठी योग्‍य मूल्‍य मिळाले आहे, कोणत्‍याही घातक कीटकनाशकांचा वापर करण्‍यात आलेला नाही, बाल मजूरांना प्रतिबंध असून तसेच हे कापड बनवताना पर्यावरणाचे संरक्षण करण्‍यात आले आहे.

या सहयोगाबाबत बोलताना इंडियन टेरेन फॅशन लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. चरथ नरसिंहन म्‍हणाले, ''आपणा सर्वांना माहितच आहे की, फॅशन क्षेत्र सर्वसमावेशक राहिले आहे आणि अधिक पर्यावरणास अनुकूल बनत आहे. अधिक स्थिर राहणीमानाचा अवलंब करण्‍याप्रती ग्राहकांमध्‍ये सतत चर्चा होत आहे. आम्‍ही फेअरट्रेड इंडियासोबतच्‍या आमच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून विश्‍वास, स्थिरता व दर्जाच्‍या या वाढत्‍या पैलूंची पूर्तता करत स्थिरतेप्रती आणखी एक पाऊल उचलले आहे. ज्‍यामुळे आम्‍ही गुजरात जिल्‍ह्यामधील शेतक-यांकडून आणण्‍यात आलेली, तसेच फेअरट्रेड कापसापासून बनवण्‍यात आलेली उत्‍पादन रेंज निर्माण करणारा भारताचा पहिला हाय स्ट्रट ब्रॅण्‍ड बनलो आहोत.'' 

ते पुढे म्‍हणाले, ''अधिक पुढे जात आमचा पुढील तीन वर्षांमध्‍ये फेअरट्रेड कापूस, पुनर्चक्रण केलेला कापूस, पुनर्चक्रण केलेले पॉलिस्‍टर आणि बांबू व ताग यासारखी सेंद्रिय व नैसर्गिक फायबर्सपासून काळजीपूर्वक व स्थिरपणे ५० टक्‍क्‍यांहून अधिक पोर्टफोलिओ उत्‍पादित करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही प्रमाणित पुरवठादारांसोबत काम करू आणि पुरवठा साखळी भागीदार आमच्‍या उद्देशांशी संलग्‍न असल्‍याच्‍या खात्रीसाठी वापरण्‍यात येणा-या कच्‍चा मालांचा शोध घेण्‍याची क्षमता सादर करू. आम्‍ही बायो-डिग्रेडेबल पॅकेजिंग व उत्‍पादन पुनर्चक्रणाच्‍या माध्‍यमातून इतर प्रक्रियांप्रती स्थिर उपक्रम देखील सुरू करू.''

फेअरट्रेड इंडियासोबतच्‍या सहयोगाने सादर करण्‍यात आलेले इंडियन टेरेनचे नवीन कलेक्‍शन ग्राहकांना जबाबदार स्‍टाइल स्‍टेटमेंटसह अधिक फॅशनेबल अॅपरल्‍स देते. विविध प्रकाच्या अद्वितीय ग्राफिक प्रिट्स, आकर्षक व पेस्‍टल रंगांची रेंज, इंडियन टेरेन कापडाचे कम्‍फर्ट कलेक्‍शनला आवडीचे बनवतात. कॅप्‍सूल कलेक्‍शन सध्‍या टी-शर्टसचे कलेक्‍शन देते, ज्‍यामध्‍ये पुरूष व मुलांसाठी क्रू नेक टी-शर्टसचा समावेश आहे आणि या कलेक्‍शनमध्‍ये अधिक वाढ करत टी-शर्टस व्‍यतिरिक्‍त शर्टस व ट्राऊझर्सचा समावेश करण्‍यात येईल. ग्राहकांनी इंडियन टेरेन फेअरट्रेड कलेक्‍शनमधून अधिक उत्‍पादने खरेदी केल्‍यास शेतकरी संघटना प्राप्‍त करणा-या फेअरट्रेड प्रीमिअमचे प्रमाण अधिक असेल. स्थिरता तुम्‍हाला उत्तम भावना देते.

फेअरट्रेड इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिषेक जानी म्‍हणाले, ''जागतिक फॅशन उद्योगक्षेत्र कोविड-१९च्‍या परिणामांमधून सावरण्‍याचा प्रयत्‍न करत असताना इंडियन टेरेनने स्थिरतेला चालना देण्‍याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या फेअरट्रेड कलेक्‍शनच्‍या सादरीकरणासह इंडियन टेरेन भूमाता आणि त्‍यांच्‍या पुरवठा साखळीमधील असुरक्षित समुदायांप्रती कटिबद्धता दाखवण्‍यासोबत भारतीय कापूस उत्‍पादक शेतक-यांना त्‍यांच्‍या उत्‍पादनांसाठी बाजारपेठ मिळण्‍याची आणि योग्‍य मूल्‍य मिळण्‍याची देखील खात्री देते. फॅशन उद्योगक्षेत्रामध्‍ये कार्यरत असलेल्‍या ब्रॅण्‍ड्स व व्‍यवसायांनी प्रदूषण आणि उत्‍सर्जन चक्राचे निराकरण करण्‍यामधील किंवा सकारात्‍मक परिवर्तन व सामाजिक सक्षमीकरणाचे एजंट्स बनण्‍यामधील त्‍यांची भूमिका ओळखली पाहिजे. इंडियन टेरेन सारख्‍या मोठ्या स्‍थानिक ब्रॅण्‍डची कापसामधील मोठ्या स्थिरतेप्रती कटिबद्धता या कृषी समुदायांमध्‍ये भावी विकास प्रकल्‍पांना चालना देण्‍यास प्रेरित करते आणि आशेचा किरण निर्माण करते की, फॅशन उद्योगक्षेत्र पर्यावरणदृष्‍ट्या व सामाजिकदृष्‍ट्या जबाबदार फॅशनप्रती सखोल कटिबद्धता राखत महामारीच्‍या परिणामांमधून बाहेर पडू शकते.'' 

इंडियन टेरेनने विशेष अर्थ खाकी उत्‍पादन रेंज सादर करण्‍यासह त्‍यांचा स्थिरतेप्रती प्रवास सुरू केला. ही रेंज एसएस२० कलेक्‍शनचा भाग म्‍हणून सादर करण्‍यात आली. संपूर्ण कलेक्‍शनमध्‍ये नैसर्गिकरित्‍या प्राप्‍त केलेल्‍या रंगांचा समावेश आहे. हा प्रवास फेअरट्रेड इंडियासह स्थिर उत्‍पादन रेंजच्‍या सादरीकरणासह सुरूच राहिल. सध्‍या ही रेंज निवडक स्‍टोअर्समध्‍ये आणि https://www.indianterrain.com/ येथे उपलब्‍ध आहे.    

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO