नवी मुंबईत अपोलो रुग्णालयाने इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीमध्ये उचलले महत्त्वाचे पाऊल
भारतातील पहिल्या ‘स्टेंट पोझिशनिंग असिस्टन्स सिस्टिम’ चा यशस्वी वापर
नवी मुंबई, १७ ऑगस्ट २०२३: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सला इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टच्या अत्यंत कुशल टीमच्या मदतीने रुग्णाच्या हृदयात स्टेंट बसवण्यासाठी स्टेंट पोझिशनिंग असिस्टन्स सिस्टिम (एसपीएएस) चा यशस्वीपणे वापर केला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने वैद्यकीय उच्च-गुणवत्तेची रुग्ण सेवा प्रदान करण्याची वचनबद्धता कायम ठेवली आहे. वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.राहुल गुप्ता, कार्डिओलॉजीचे सल्लागार आणि सहयोगी प्राध्यापक डॉ.चरण रेड्डी आणि कार्डिओलॉजीचे कनिष्ठ सल्लागार डॉ.राजेश मट्टा यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय टीमने पर्क्यूटेनियस ट्रान्सलुमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी (पीटीसीए) प्रक्रियेदरम्यान नाविन्यपूर्ण स्टेंट पोझिशनिंग असिस्टन्स सिस्टिम (एसपीएएस) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या यशामुळे भारतातील जटिल पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेन्शन्स (पीसीआय) च्या क्षेत्रात एक नवीन युग सुरू झाले आहे असेच म्हणावे लागेल.
हे ऐतिहासिक प्रकरण नवी मुंबईतील रहिवासी असलेल्या ५८ वर्षीय महिला रुग्णाच्या बाबतीत घडले. या महिलेला सुमारे सुमारे १० दिवस छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हायपोथायरॉयडीझमचा त्रास होता, ट्रेडमिल चाचणी (टीएमटी) पॉझिटिव्ह आली, तिचे हृदय प्रत्येक वेळी ६०% रक्त तिच्या लेफ्ट वेंट्रिकलमधून (मुख्य पंपिंग चेंबर) बाहेर पंप करत होते, जे ५५% आणि ७०% च्या सामान्य श्रेणीमध्ये होते. म्हणून तिला कोरोनरी अँजिओग्राफी (सीएजी) करण्याचा सल्ला देण्यात आला, परिणामी डाव्या अँटीरियर डिसेंडिंग आर्टरी (एलएडी) मध्ये गंभीर ऑस्टिअल स्टेनोसिस दिसून आले आणि म्हणून तिला पर्क्यूटेनियस ट्रान्सलुमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी (पीटीसीआय) करण्याचा सल्ला देण्यात आला.
डॉ.राहुल गुप्ता, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट,अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,"हा केवळ अपोलो हॉस्पिटल्ससाठीच नव्हे तर भारतातील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीसाठीही महत्त्वाचा क्षण आहे. स्टेंट पोझिशनिंग असिस्टन्स सिस्टिम (एसपीएएस) मुळे पीसीआय प्रक्रियेत, विशेषत: कोरोनरी धमनीच्या ऑस्टियमच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारची अचूकता येते. या अभिनव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, आम्ही रुग्णांना सर्वोत्तम परिणाम देण्याची आमची क्षमता वाढवली आहे आणि जेव्हा गुंतागुंतीची प्रकरणे येतात तेव्हा आम्ही इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीमधील महत्त्वपूर्ण आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला आहे."
स्टेंट डिलिव्हरी सिस्टीममध्ये सतत प्रगती होत असूनही कोरोनरी धमन्यांच्या ऑस्टियम (उघडण्याच्या जागेवर) मध्ये स्टेंटच्या पोझिशनिंगची अचूकता हे एक आव्हान आहे. अध्ययनातून असे दिसून आले आहे की अँजिओग्राफीच्या पद्धतीने स्टेंटिंग केल्यामुळे स्टेंट चुकीच्या पद्धतीने बसवण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे अचूक स्टेंट प्लेसमेंट केलेल्या रूग्णांच्या तुलनेत उच्च रेस्टेनोसिस आणि टार्गेट लेशन रिव्हॅस्क्युलायझेशन (टीएलआर) ची आवश्यकता अधिक असते. एसपीएएस सादर केल्यामुळे जटिल पीसीआय प्रक्रियेदरम्यान सुधारित नियंत्रण तसेच अचूक स्टेंट प्लेसमेंटसाठी अनुमती देणाऱ्या नाविन्यपूर्ण, सुरक्षित आणि कार्यक्षम उपकरणाच्या मदतीने या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल.

Comments
Post a Comment