‘देश के धागे’ हातमाग कलांचा सन्मान टाटा-टी प्रीमियम कॅम्पेन

‘देश के धागे’ हातमाग कलांचा सन्मान टाटा-टी प्रीमियम कॅम्पेन

महाराष्ट्र व मुंबईची ओळख, पैठणी सिल्कच्या सन्मानार्थ तयार करण्यात आले स्पेशल प्रॉडक्ट पॅक

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३: टाटा टीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमधील एक प्रमुख ब्रँड टाटा टी प्रीमियमने यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त #DeshKaGarv (देश का गर्व) या आपल्या उपक्रमामधून भारत देश व येथील प्राचीन, समृद्ध कला, संस्कृती आणि वारसा यांचा गौरव करण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षी टाटा टी प्रीमियमने भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील ७५ वर्षांमधील काही प्रमुख अभिमानास्पद घटनांचा गौरव केला होता. यंदाच्या वर्षी या ब्रँडने देश के धागे अभियान. यामध्ये टाटा-टी प्रीमियमने भारतातील हातमागाच्या समृद्ध परंपरेचा गौरव करत संपूर्ण देशाला अभिमानास्पद वारशाची रंगीबेरंगी व मनमोहक सफर घडवण्याचे ठरवले आहे. क्षेत्रीय अभिमानाचे सार दर्शवत, महाराष्ट्र आणि मुंबईसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा टी प्रीमियमच्या पॅकवर विराजमान झाली आहे राजेशाही पैठणी. जगभरात सुप्रसिद्ध असलेली पैठणी सर्वोत्तम रेशमी धागे व प्युअर जरीपासून तयार केली जाते. मनमोहक रंगसंगती आणि पारंपरिक नक्षीकामाने सजलेली, शाही पैठणी 'स्टेटमेंट पीस' मानली जाते. 

म्युलेन लिंटासने तयार केलेल्या एका अतिशय आकर्षक टीव्हीसीमध्ये सर्व पॅक्सची गोष्ट एकत्र विणण्यात आली आहे. भारतीय हातमागांच्या समृद्ध वारशाचा गौरव या टीव्हीसीमध्ये करण्यात आला आहे. भारतीय हातमागांच्या चाहत्या, दिग्गज गायिका उषा ऊथुप यांनी या टीव्हीसीसाठी गाणी गायली आहेत. भारतीय हातमागांचे वैविध्य आणि सौंदर्य दर्शवणारी ही टीव्हीसी पाहताना देशाभिमानाने ऊर भरून येतो. देशाच्या समृद्ध परंपरांच्या सुंदर धाग्यांमध्ये सर्व देशवासियांच्या भावना एकत्र विणण्याची ही संकल्पना अतिशय प्रभावी ठरली आहे. टीव्हीसीमधील प्रत्येक फ्रेममध्ये भारताची सांस्कृतिक ओळख स्वतःच्या हातांनी घडवणाऱ्या कुशल विणकारांचा सन्मान या टीव्हीसीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील शानदार बनारसी सिल्कपासून पंजाबमधील सुंदर फुलकारीपर्यंत भारतातील प्रत्येक हातमागाची कहाणी या फिल्ममध्ये गाण्यातून सांगितली गेली आहे. देशाचा अभिमान एकसंध ठेवणाऱ्या धाग्यांचा गौरव करणाऱ्या टीव्हीसीमधील संदेश हृदयाला भिडतो.

श्री.पुनीत दास, प्रेसिडेंट-पॅकेज्ड बेवरेजेस (भारत व दक्षिण आशिया), टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स यांनी सांगितले, "स्वातंत्र्यदिनानिमित्त 'देश का गर्व' हा उपक्रम सुरु करून टाटा टी प्रीमियम आपल्या देशातील निपुण कारीगरांचा, त्यांची कलेप्रतीची निष्ठा, कला व आपल्या सांस्कृतिक वारशामध्ये त्यांचे अतुलनीय योगदान यांचा सन्मान करत आहे. या अभियानातून आम्ही प्रत्येक भारतीयाला आपल्या देशातील वैविध्यपूर्ण क्षेत्रीय हातमागांचा व आपल्या देशाचा अभिमान विणणाऱ्या धाग्यांचा सन्मान करण्यासाठी प्रेरित करू इच्छितो. शिवाय 'देशाचा चहा' या आपल्या ख्यातीला अनुसरून सर्व देशवासियांना प्रेम, एकता व अभिमानाच्या धाग्यांमध्ये एकत्र ठेवतो."

अभियानाचा एक भाग म्हणून देशभरातील विणकरांनी खास तयार केलेले एक कलेक्शन ओखाईवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. www.OKHAI.org वर त्याची खरेदी करता येईल. विक्रीतून उभ्या राहणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम टाटा टी प्रीमियम कारीगर समुदायाच्या कल्याणासाठी देणार आहे.

ब्रँड फिल्म पाहण्यासाठी क्लिक करा : https://www.youtube.com/watch?v=TVFAlcr6MKA.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO