२५ ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपटगृहांत

 २५ ऑगस्टला  सुभेदार  चित्रपटगृहांत

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या सुभेदार’ या मराठी  चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. सुभेदारांची अभंग स्वामीनिष्ठादुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याला तळपणाऱ्या तलवारीची साथ या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या चित्रपटातून होणार आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशातून त्यांची  या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केली आहे. सुभेदार चित्रपटाच्या टिझरट्रेलरगाण्यांमधून प्रेक्षकांची उत्सुकता याआधीच शिगेला पोहचली आहे. राज्यातील शेकडो चित्रपटगृहांसह,  देशातील महत्त्वाच्या शहरांतून तसेच ६ विविध देशांमध्ये सुभेदार शुक्रवार २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.    

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमा सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर,  कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन सुभेदार  चित्रपटात होणार आहे. मृणाल कुलकर्णीचिन्मय मांडलेकरअजय पूरकरसमीर धर्माधिकारीअभिजीत श्वेतचंद्रस्मिता शेवाळेउमा सरदेशमुख,  अलका कुबल,  ज्येष्ठ दिग्दर्शक मा.राजदत्तदिग्पाल लांजेकरमृण्मयी देशपांडेआस्ताद काळेशिवानी रांगोळेविराजस कुलकर्णीअजिंक्य ननावरेरिषी सक्सेनानूपुर  दैठणकर,  अर्णव पेंढारकर आदि मराठीतील दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.  चित्रपटातील मावळं जागं झालं रं’, ‘आले मराठे’, ‘हळद लागली रायबाला ही तीनही गाणी सध्या तुफान गाजतायेत. देवदत्त बाजीअवधूत गांधीसुवर्णा राठोड,  रोहित राऊतनिधी हेगडे यांच्या स्वरांनी या चित्रपटातील गाणी सजली असून संगीतकार देवदत्त बाजी यांचे संगीत गाण्यांना लाभले आहे. 

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या सुभेदार चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन्समुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लिपृथ्वीराज प्रोडक्शनराजाऊ प्रोडक्शनपरंपरा प्रोडक्शन्स यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकरअनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरश्रमिक गोजमगुंडेविनोद जावळकरशिवभक्त अनिकेत जावळकरश्रुती दौंड हे सुभेदार चित्रपटाचे निर्माते आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO