सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये होणार हुर्डा पार्टी ! 

मुंबई २२ जानेवारी, २०२१ : सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये बर्‍याच घटना घडत आहेत... मग ते कामिनीचे घरात येऊन लतिकाचा अपमान करण असो वा अभिमन्युचीला लतिकाची आणि लतिकाला अभिमन्युची साथ मिळणं असो... अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे... त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतातमग ते अभिचे स्वप्न पूर्ण करायचे असो वा दौलतच्या विरुध्द उभे राहायचे असोअभिमन्युचे अकॅडमीचे लतिकाच्या साथीने आणि पुढाकाराने पूर्ण होताना दिसते आहे तर अभिच्या साथीने लतिकाने आता जाहिरात करण्याचा मोठा निर्णिय घेतला आहे आणि त्याला अप्पांचीदेखील परवानगी मिळाली आहे... आता लवकरच अकॅडमी जिथे बनणार आहे त्या जागेचे भूमिपूजन देखील होणार आहे... हा दिवस अभिमन्युसाठी खूप मोठा आहे... घरातील सगळेच खूप खुश आहेत... दुसरीकडे कामिनी आणि दौलत बरेच नाराज आहे ... आता भूमिपूजननंतर जहागीरदार कुटुंब एकत्र मिळून हुर्डा पार्टी करणार आहेत... थंडी अजूनही काही कमी होत नाही. त्यामुळे या थंडीत हुरडा पार्टी करण्याची संधी अभि आणि लतिच्या परिवाराने काही सोडली नाही... हिवाळा आलाकी हुरडा पार्टीला जायचे बेत ठरू लागतात. आता या पार्टीमध्ये नक्की सगळ्यांनी मिळून काय काय मज्जा केली हे लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे... मस्त शेकोटी पेटवून सगळं कुटुंब या हुर्डा पार्टीची मज्जा घेणार आहे... माई, अप्पा, अभी, लतिका, लतिकाचे आई वडील, आजी ... तेंव्हा नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचा विशेष भाग...

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..