ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधील अभिनेत्री गौरी कुलकर्णीने घेतली नवीन कार
परदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते. अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
मालिकेतील प्रमुख अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही २०२१ या नवीन वर्षात सर्व इच्छा आकांशा पूर्ण करताना दिसतेय. गौरीने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. तिने या नवीन गाडीचे स्वागत करतानाचे फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या नवीन गाडीचे स्वागत करताना गौरीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने गाडी सोबतचा फोटो 'एक नवीन सदस्य' असं कॅप्शन लिहून पोस्ट केला आहे. ही गाडी घेणे हे गौरीचं स्वप्न होतं त्यामुळे या स्वप्नपूर्तीचा क्षणी गौरी थोडी भावनिक झाली तसंच तिला अभिमान देखील वटतोय. चाहत्यांसोबतच गौरीचा मित्रपरिवार आणि सहकलाकार या आनंदाच्या क्षणी तिचं अभिनंदन करत कौतुक करताना दिसत आहेत. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत गौरीचे सहकलाकार प्रिया मराठे, तेजस बर्वे यांनी देखील तिला अभिनंदन करून नवीन गाडीतून राईड कधी मिळणार? असं विचारलंय त्यावर गौरीने लवकरच असं म्हंटल आहे. गौरीची सगळी स्वप्नं नवीन वर्षात पूर्ण होवो आणि ती अशीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहो हीच सदिच्छा.
Comments
Post a Comment