अभिनेत्री आर्या वोराने केली दुबईची सफर, फिरली खाजगी विमान आणि बोटीतून, एकदा व्हिडीओ बघाच !
अभिनेत्री आर्या वोरा फेमस ट्रॅवल ब्लॉगर आहे शिवाय ती उत्तम फॅशन आणि लाईफस्टाईल ब्लॉगरही आहे. तिच्या युट्यूब व्हिडीओजना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. ती सध्या दुबईमध्ये फिरत आहे. तिचे दुबईचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिने चक्क दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोट (याच्ट्) बूक करून आनंद लुटला आहे. 'देवों के देव महादेव' टेलिव्हिजन मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेल्या आर्याने लॉकडाऊन मध्येच स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले होते. कमीवेळेतच तिच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोवरचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.
आपल्या व्हिडीयोब्लॉगव्दारे आपल्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आर्याने लॉकडाऊननंतर सावधानता बाळगत उदयपूर, अमृतसर, हिमाचलप्रदेश आणि गोव्यात सोलो प्रवास केला. त्यानंतर ती दुबईला रवाना झाली. दुबईत तीने खाजगी विमान आणि आलिशान बोटीतून (याच्ट्) प्रवास केला. त्याविषयी ती सांगते, “दुबईत मी फिरत असताना मला समजलं की काही तासांकरीता खाजगी विमान आणि खाजगी बोटीची सुविधा आहे. त्यामुळे मला पायलट फरीद लफ्ता यांनी रस अल खैमा याठीकाणी विमानाची रोमांचक सफर घडवली. त्या सुंदर विमानातून दुबईचे नजारे डोळ्याचं पारणं फिटवणारे होते. त्यानंतर दुस-यादिवशी मी मरीना तलावात एक खाजगी बोट भाड्याने घेतली आणि त्यात दिवसभर बोटीतून प्रवास केला. त्या लक्झरीअस बोटीत स्टॅनली पॉल या फोटोग्राफरने माझं छानसं फोटोशुट केलं. संपूर्ण बोट ही आलिशान होती. आणि तिथे खाण्यापिण्याची उत्तम सोय होती. माझ्या बकेट लीस्टमधल्या या दोन गोष्टी पूर्ण झाल्यामुळे मला फार आनंद होत आहे. ”
अभिनेत्री आर्या वोराचे दुबईचे युट्यूब व्हिडीओज् पाहून तुम्हालाही फिरावसं नक्कीचं वाटलं असेल. तिचे आणखीन रोमांचक व्हिडीओज बघण्यासाठी तिला सबस्क्राईब करा. आणि या नविन वर्षात तुम्ही सुद्धा एक सोलो ट्रिप जरूर करा.
Youtube Links -
Private Plan Video - https://www.youtube.com/
Private Yacht Video - https://www.youtube.com/
Comments
Post a Comment