सुपरस्टार अंकुश चौधरी व चितळे" उद्योग समूहाचे केदार चितळे , गिरीष चितळे , संजय चितळे आणि मुंबईतील पहिल्या फ्रॅन्चाइजीच्या आरती आणि अतिन कांबळे यांच्या हस्ते पुण्यातील प्रसिध्द चितळे" उद्योग समूह यांचे चितळे एक्सप्रेस’ हा फ्रॅन्चाइजी तत्वावरचा नवीन उपक्रम २८ जानेवारी रोजी झाला शुभारंभ,
चितळे उत्पादन आता मुबंईत उपलब्ध,, दादर पश्चिम येथील रानडे रोडवर सुरू झाली आहे ‘चितळे एक्सप्रेस’,
मुंबईच्या प्रत्येक उपनगरात ‘चितळे एक्प्रेस’ सुरु करण्याचा “चितळे" उद्योग समूहचा मानस
मुंबई : पुणे म्हटले कि शहराच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एकअसलेली सर्वात आधी आठवते ती चितळ्यांची बाकरवडी.ही बाकरवडी आणि चितळ्यांची विविध प्रकारच्या मिठाया आणि नमकीन पदार्थ आता अगदी जशीच्या तशी मुंबईत मिळणार आहेत, ती ‘चितळे एक्सप्रेस’च्या माध्यमातून. मुंबईत दादर पश्चिम येथील रानडे रोडवर ‘चितळे एक्सप्रेस’ ही“चितळे" उद्योग समूह यांची फ्रॅन्चाइजी उघडली आहे. मराठीतील आघाडीचा सुपरस्टार अंकुश चौधरी , चितळे" उद्योग समूहाचे केदार चितळे , गिरीष चितळे , संजय चितळे आणि मुंबईतील पहिल्या फ्रॅन्चाइजीच्या आरती आणि अतिन कांबळे यांच्या हस्ते २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता हा शुभारंभ झाला.
“आता चितळेची बाकरवडी किंवा श्रीखंड आणण्यासाठी पुण्याला जायची किंवा तिथून कुणी येत असेल तर त्याला ते आणायला सांगण्याची गरज नाही. हे पदार्थ आता मुंबईत दादर येथेच मिळणार आहेत. २८ जानेवारी २०२१ रोजी रानडे रोडवरील ‘चितळे एक्सप्रेस’चा शुभारंभ झाला आहे. मी आता येथे नेहमी भेट देणार आहे. तुम्हीही या,” श्री.अंकुश चौधरी म्हणाले.
गेली ६२ वर्षे गोड आणि नमकीन पदार्थांची पुणेकरांची चव चितळे" उद्योग समूह पूर्ण करत आले आहेत. त्यातही चितळे बंधूंची सर्वाधिक लोकप्रिय आहे ती बाकरवडी. आता तर दिवसाला ३००० किलो बाकरवाडी विकल्या जातात आणि चितळे यांच्या दुकानात दररोज जवळजवळ ४००० ते ५००० ग्राहक खरेदी करतात. त्यांची बाकरवडी आणि विविध प्रकारच्या मिठाया आणि नमकीन पदार्थ अमेरिका, इस्रायल आणि सिंगापूर यांसारख्या अनेक देशांमध्ये निर्यात होते. हेच पदार्थ आता मुंबईकरांना मुंबईतील पहिल्या फ्रॅन्चाइजीच्या अर्थात ‘चितळे एक्सप्रेस’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. दुकान क्रमांक २, प्लॉट क्रमांक २१७, श्री स्वामी समर्थ कृपा, रानडे रोड, दादर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२८ या पत्यावर असलेली ‘चितळे एक्सप्रेस’ आरती आणि अतिन कांबळे चालवत आहेत. कांबळे दाम्पत्य गेली कित्येक वर्षे “चितळे" उद्योग समूह यांचे मुंबईतील पुरवठादार म्हणजे स्टॉकीस्ट आहेत.
श्री केदार चितळे, भागीदार, चितळे" उद्योग समूह म्हणाले की, “चितळे एक्सप्रेस’ हा आमचा एक नवीन उपक्रम असून त्याद्वारे आम्ही ज्यांची शेल्फ लाईफ चांगली आहे अशी उत्पादने पुणे येथून देशात सर्वत्र पाठवतो. ही उत्पादने आता फ्रॅन्चाइजी तत्वावर उपलब्ध करणार आहोत.मुंबईतील ही पहिली ‘चितळे एक्सप्रेस’ आहे. येथे दही, श्रीखंड, तूप, यांसारखी दुध आणि दुग्धजन्य उत्पादने, बाकरवडी, चिवडा ही नमकीन, आंबाबर्फी, काजू कतली, पेढे हे पदार्थ देखील उपलब्ध आहेत.”
श्री चितळे पुढे म्हणाले, “या व्यवसाय मॉडेलमध्ये साधारण ४००चौरस फुट जागेमध्ये फ्रॅन्चाइजी सुरु करुन फक्त आमची उत्पादने विकता येतात. या फ्रॅन्चाइजीसाठी आमच्या स्टॉकिस्टकडून माल उपलब्ध होत असल्याने स्थानिक पातळीवर ताज्या मालाचा पुरवठा होतो.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही उत्पादने आता सर्वदूर पाठवली जात आहेत.”
आगामी योजनांबद्दल बोलताना श्री केदार चितळे म्हणाले की, मुंबईच्या प्रत्येक उपनगरात एक ‘चितळे एक्प्रेस’ सुरु करण्याचा आमचा मानस आहे. “आम्ही कुणाशी स्पर्धा करत नाही कि कुणाची नक्कल करत नाही. आमची संस्कृती मुल्ये आणि दर्जा यांच्या जोरावर आम्ही आमचा व्यवसाय करतो. मुंबईत प्रवेश करताना ठराविक ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवलेला नसून संपुर मुंबई हाच आमचा टार्गेट ऑडीयन्स आहे
मुंबईतील पहिल्या फ्रॅन्चाइजीच्या आरती आणि अतिन कांबळे म्हणाले, “आम्ही गेली कित्येक वर्षे “चितळे" उद्योग समूह यांच्या उत्पादनांचा पुरवठा करत आहोत. त्याअर्थी या उत्पादनांशी आमचे जुने नाते आहे. मुंबईतील पहिले ‘चितळे एक्सप्रेस’ सुरु करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याद्वारे चितळे यांची दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देत त्यांच्या समाधानाचे धनी आता आम्हाला होता येईल.”
Comments
Post a Comment