#ChupNaBaitho डिजिटल मोहिमेद्वारे एएससीआयने आपल्या ग्राहकसंपर्क मोहिमांची व्याप्ती वाढवली

       आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात तक्रार करण्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एएससीआयचा नवा ग्राहकलक्ष्यी उपक्रम

       पहिल्या ३ महिन्यांमध्ये मुंबई, नवी दिल्लीमध्ये प्रायोगिक पातळीवर राबवणार

मुंबई, २९ जानेवारी २०२१: आक्षेपार्ह जाहिरातींविषयी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल (एएससीआयकडून कृतीचे आवाहन करणारी #ChupNaBaitho ही डिजिटल मोहीम सुरू केली जात आहे. ही मोहीम आक्षेपार्ह जाहिरातींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि अशा जाहिरातींविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी पुढे येण्यास ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी एएससीआयने या वर्षासाठी आखलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी ही मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून या काळामध्ये एएससीआय कडून मुंबई व नवी दिल्लीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

एएससीआयच्या ट्रस्ट इन अॅडव्हर्टायझिंग रिपोर्ट – २०२० मधील काही महत्त्वाच्या निष्कर्षांपैकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे दिशाभूल करणारी जाहिरात पाहणा-या ग्राहकांपैकी केवळ १० टक्‍के ग्राहक अशा जाहिरातीच्या विरोधात तक्रार नोंदवतात. सुमारे २० टक्‍के माणसे या जाहिरातींबद्दल सोशल मीडियावर बोलतात आणि ६५-७० टक्‍के लोक केवळ आपापसांत चर्चा करतात किंवा निष्क्रीय राहतात. म्हणजे ढोबळमानाने बोलायचे झाले तर बहुतांश ग्राहक आक्षेपार्ह जाहिरात पाहूनही तिच्यामध्ये बदल व्हावा म्हणून कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत. एएससीआयकडे ग्राहकांच्या अशा तक्रारी अधिकाधिक संख्येने नोंद व्हाव्यात आणि त्यायोगे बाजारातील आक्षेपार्ह जाहिरातींची संख्या कमी व्हावी हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.

२०१८ आणि २०२० या कालावधीमध्ये १९०६ जाहिरातींविरोधात ९२८३ तक्रारी नोंदवल्या गेल्या. अंतिम ग्राहकांनी केलेल्या या तक्रारींपैकी सुमारे ५७ टक्‍के तक्रारी २०१८-२०१९ मध्ये तर ४३ टक्‍के तक्रारी या २०१९-२०२० मध्ये नोंदवल्या गेल्या. २०१९-२०२० मध्ये ६६२ जाहिरातींविरोधात ४६८३ जाहिरातींची नोंद एएससीआयकडे झाली – यात एएससीआयने स्वत: पुढाकार घेऊन मोठ्या संख्येने दाखल केलेल्या सुओ-मोटो तक्रारींखेरीज थेट ग्राहकांकडून आलेल्या तक्रारी, ९४ इंडस्ट्रीमधील अंतर्गत तक्रारी, १२ फास्ट-ट्रॅक, सरकारच्या माध्यमातून आलेली एक जाहिरात तर ग्राहक संघटनांच्या माध्यमातून आलेल्या २८ जाहिरातींचा समावेश होता.

या मोहिमेमध्ये तिच्या हेतूशी निगडित विषयांवरील सोशल मीडिया पोस्ट्स आणि कृतीसाठीची हाक यांचा समावेश असेल. भावना दुखावणा-या, दिशाभूल करणा-या, खोटी वचने देणा-या, घातक उत्पादनांची भलामण करणा-या इत्यादी जाहिरातींविरोधातील तक्रार कधी व कशी नोंदवावी याबद्दलची माहिती ग्राहकांना दिली जाईल. ही मोहीम आजपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुक तसेच इतर डिजिटल मंचांवर लाइव्ह प्रक्षेपित होत आहे.

एएससीआयच्या सेक्रेटरी जनरल मनिषा कपूर म्हणाल्या: ग्राहकांना या लढ्यातील सहकारी बनवून घेणे हे एएससीआयच्या प्रमुख उद्दीष्टांपैकी एक महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांबद्दल अधिक जागरुक असावे, एखादी जाहिरात आक्षेपार्ह आहे म्हणजे नेमके काय याबद्दल त्यांच्या मनात स्पष्टता असावी असे आम्हाला वाटते. जाहिरातींमधील अशा खोट्या दाव्यांबद्दल त्यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही अशा तक्रारींवर झटपट आणि निर्णायक कारवाई करू. दिशाभूल करणा-या आणि आक्षेपार्ह जाहिरातींची संख्या लक्षणीयरित्या कमी करणे हे आमचे सर्वसाधारण लक्ष्य आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही यासंदर्भात अनेक मार्गदर्शक सूचना, अहवाल आणि शिफारसी प्रसारित केल्या आहेत. उदाहरणार्थ, कोविड-१९ जाहिरात आणि खरेखुरे रोख इनाम मिळवून देणा-या ऑनलाइन गेमिंगविषयीच्या जाहिराती. ग्राहकांचा जाहिरातींवर किती विश्वास आहे याचा अभ्यास करणारा ट्रस्ट इन अॅडव्हर्टायझिंग रिपोर्ट हे आम्ही ग्राहकांच्या सुरक्षेकडे किती एकाग्रतेने लक्ष देतो याचे उदाहरण आहे. #ChupNaBaitho मोहीम म्हणजे याच लक्ष्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. आपल्याला आक्षेपार्ह वाटणा-या जाहिरातींविरोधात ग्राहकांनी, विशेषततरुण ग्राहकांनी तक्रार नोंदवावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्हाला करायचे आहे. ही जाहिरात म्हणजे केवळ एक सुरुवात आहे आणि यानंतर वर्षभरात असे इतरही अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.

दिशाभूल करणा-या जाहिरातींविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहक एएससीआयची वेबसाइट ascionline.org ला भेट देऊ शकतात किंवा ७७१००१२३४५ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेशही पाठवू शकतात.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ