भारताच्‍या ७२व्‍या प्रजासत्ताक दिनानिमित्त सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनकडून मुंबईच्‍या 'सफाई कर्मचा-यांचा' सन्‍मान

फाऊंडेशनने सध्‍या सुरू असलेल्‍या महामारीमध्‍ये देखील शहराला स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी अथक मेहनत घेतलेल्‍या मुंबईच्‍या ७५ क्‍लीन-अप मार्शल्‍सचा सन्‍मान केला.

मुंबई, २६ जानेवारी २०२१: भारतीय इतिहासामधील सर्वात महत्त्वपूर्ण दिवसाला मानवंदना म्‍हणून सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमधील (मुंबई महापालिका - बीएमसी) ७५ बीएमसी मार्शल्सचा सन्‍मान केला आहे. या ख-या सुपरहिरोंच्‍या नि:स्‍वार्थ समर्पिततेचा सन्‍मान करण्‍यासाठी फाऊंडेशनने प्रत्‍येक मार्शलला वैयक्तिकृत ''थँक यू'' मग्‍स दिले. नरिमन पॉइण्‍ट येथील बीएमसी - दक्षिण प्रभाग येथे समारोहाचे आयोजन करण्‍यात आले. या समारोहाला  श्री अतुल प्रभाकर जातगवकर, सहाय्यक प्रमुख पर्यवेक्षक ए प्रभाग, सहायक प्रमुख पर्यवेक्षक , श्री. नरेंद्र परमार, पर्यवेक्षक (ए-प्रभागाचे - दक्षिण), श्री. भगवान बाबू कांबळे, पर्यवेक्षक (ए प्रभाग - उत्तर), सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या मानव संसाधनाच्‍या उपाध्‍यक्षा स्‍मृती कसुलवार आणि मार्शल्‍सना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्‍यासाठी आलेले फाऊंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या मानव संसाधन, प्रशासनाचे सहाय्यक व्‍यवस्‍थापक अक्षय आंबेरकर म्‍हणाले,''वर्ष २००२ मध्‍ये आमच्‍या कार्यसंचालनांना सुरूवात झाल्‍यापासून बीएमसी सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनची सर्वात मोठी व दीर्घकाळापासून सहाय्यक राहिली आहे. आम्‍ही बीएमसीसोबत सहयोगाने आपले खरे सुपरहिरो असलेल्या मुंबईच्‍या क्‍लीन-अप मार्शल्‍सचा सन्‍मान करत असल्‍यामुळे हा आमच्‍यासाठी अत्‍यंत अभिमानास्‍पद क्षण आहे. आम्‍ही विशेषत: महामारीदरम्‍यान शहराला स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी आणि नागरिकांचे विविध आरोग्‍यविषयक आजारांपासून संरक्षण करण्‍यासाठी अथक मेहनत घेणा-या या प्रत्‍येक मार्शलचे आभार मानतो. मानसिक, तसेच शारीरिक मेहनतीची गरज असलेल्‍या खडतर कामासाठी त्‍यांचे मनोबल उंचावण्‍यासाठी आमच्‍याकडून ही सन्‍मानाची एक लहान भेट आहे.''

श्री. नरेंद्र परमार (ए-प्रभागाचे पर्यवेक्षक) म्‍हणाले,''आम्‍ही या सन्‍मानासाठी सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनचे आभार मानतो. ''सफाई कर्मचारी'' हे खरे सुपरहिरोज आहेत. त्‍यांनी कचरा व्‍यवस्‍थापन यंत्रणेची काळजी घेण्‍यासाठी स्‍वत:चे आरोग्य धोक्‍यात टाकले आणि मुंबई शहराला स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी दिवस-रात्र काम केले. सामुदायिक आरोग्‍य स्‍वयंसेवक (सीएचव्‍ही) बीएमसीच्‍या कोविड-१९ लढ्याचे आधारस्‍तंभ राहिले आहेत. सफाई मार्शल्‍स त्‍यांचे जीवन धोक्‍यात टाकत विविध संकटे व आरोग्‍यविषयक धोक्‍यांचा सामना करत आहेत. महामारीदरम्‍यान आपल्‍या शूर मार्शल्‍सनी निरंतर कार्य केले. त्‍यांनी विषाणूसह पॉझिटिव्‍ह ठरलेल्‍या लोकांच्‍या घरांचे सॅनिटायझेशन केले, महामारीविरोधात लढण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिलेल्‍या कस्‍तुरबा हॉस्पिटलच्‍या परिसराची स्‍वच्‍छता व सॅनिटायझेशन केले, लोक सुरक्षितताविषयक नियमांचे पालन करत असल्‍याची खात्री घेण्‍यासाठी व देखरेख ठेवण्‍यासाठी बीएमसीला मदत केली. अनेक बीएमसी मार्शल्‍स देखील विषाणूसह पॉझिटिव्‍ह ठरले, पण त्‍यांना स्‍वत:ला व त्‍यांच्‍या कुटुंबांना धोका असताना देखील ते बरे होताच शहराची सेवा करण्‍यासाठी कामावर परतले. आम्‍ही त्‍यांच्‍या शौर्याला सलाम करतो.''

हा सन्‍मान मिळालेले मुकदाम विठ्ठल गोविंद जाधव म्‍हणाले,''आम्‍ही आमच्‍या अथक मेहनतीला सन्‍मानित करण्‍यासाठी खूश आहोत आणि सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनचे आभार मानतो. आम्‍हाला आमच्‍या युनियन्‍सकडून देखील प्रमाणपत्रे मिळाली आहेत. बीएमसीने देखील या अवघड काळादरम्‍यान आमची उत्तम काळजी घेतली आहे, आम्‍हाला अतिरिक्‍त वेतन दिले आहे, आम्‍हाला मास्‍क्‍स,ग्लोव्‍ह्ज व सॅनिटायझर्स सारखे सुरक्षितता गिअर दिले आहेत, तसेच फेब्रुवारी २०२०मध्‍ये विषाणूचा प्रादुर्भाव झाल्‍यापासून आमचा प्रवास व आहार खर्च केला आहे. यासारखे सन्‍मान आम्‍हाला नवीन स्‍फूर्ती देतात आणि महामारीदरम्‍यान देखील दररोज कामावर येण्‍यासाठी प्रोत्‍साहित करतात.''

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशन शहराच्‍या छुप्या हिरोना पाठिंबा देण्‍यामध्‍ये आणि त्‍यांचे मनोबल वाढवण्‍यामध्‍ये नेहमीच अग्रस्‍थानी राहिली आहे. गेल्‍या वर्षी फाऊंडेशनने मुंबईच्‍या ४० अग्निशामक सैनिकांना आपत्तकालीन स्थितींदरम्‍यान नागरिकांचे जीवन वाचवण्‍यासाठी वेळोवेळी त्‍यांनी केलेले कार्य व दाखवलेल्‍या शौर्यासाठी  सन्‍मान केला होता. फाऊंडेशनने अद्वितीय प्रकल्‍प '#AcademyGreens- २०५० पर्यंत वृक्षे' राबवण्‍यासाठी रॉबिन हूड अकॅडमीसोबत देखील सहयोग केला आहे. फाऊंडेशनसोबतच्‍या या सहयोगाच्‍या माध्‍यमातून प्रजात्ताक दिनाला २६ बीएमसी शाळा, ३ जिल्‍हा परिषद शाळा, ३ पोलिस स्‍टेशन मैदाने आणि २ बीएमसी कार्यालये येथे २७० ते ३०० वृक्षांची लागवड करण्‍यात येईल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight