निर्माते दिपक पांडुरंग राणे यांनी 'पांडू' सिनेमाला दिल्या ट्विटरद्वारे शुभेच्छा

कोरोना संकटामुळे २०२० मध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर पडला. परंतु आता योग्य ती सावधगिरी बाळगून सिनेमांच्या शुटिंगचे काम सुरू झाले आहे. तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह हळूहळू सुरू करण्यात आली आहेत.  
आज सकाळीच एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊसने कोरोनानंतरच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली. झी स्टुडीओजचा पांडू हा सिनेमा थिएटरमध्ये लवकरंच प्रदर्शित होणारं आहे. त्यावर निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
निर्माते दीपक राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ''पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला. झी स्टुडीओजने पांडू चित्रपटाची घोषणा करणं हे निर्माते, प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे. या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसनी पुन्हा थिएटरकडे पाऊलं वळवली आहेत. ही खूप पॉझिटीव्ह गोष्ट वाटते. आपली इंडस्ट्री २०२१ गाजवायला सज्ज आहे.''
सर्वांनाच आशा लागून राहीली आहे ती सिनेमांच्या हाऊसफुल्ल पाट्यांची. आता पांडू हा सिनेमा नविन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारं यात शंकाचं नाही.
Twitter

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ