झी टॉकीजवर ब्लॉकबस्टर शनिवार  

संपूर्णपणे  मराठी चित्रपटांना वाहून घेतलेली मराठीतील एकमेव वाहिनी म्हणजेच झी टॉकीज. मराठी चित्रपटप्रेमींसाठी झी टॉकीजवर येत्या शनिवारी बहारदार मनोरंजनाची मेजवानी पेश केली जाणार आहे. ब्लॉकबस्टर शनिवारमध्ये संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षक पिंजरा या सदाबहार चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकतात. व्ही. शांतारामनिर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट 'पिंजरा' म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड. संध्या आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन ४८ वर्षे होऊन गेली. ३१ मार्च १९७२ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाची जादू एवढ्या वर्षांनंतरही प्रेक्षकांवर कायम आहे. या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू आणि संध्या यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. वत्सला देशमुख आणि नीळू फुले या कलाकारांसह सरला येवलेकर, माया जाधव, उषा नाईक, शोभा सासने, अनिता वंटमुरीकर, के. घोरपडे, दत्ता सागर, आनंदा पाटील, बाळ वेदांते, अनंत किमये, नर्मदा मोरे, बाळासाहेब गावडे, भालचंद कुलकुर्णी, बी. माजनाळकर, काका चिटणीस, पंडीत विधाते, जी. सावंत, जी मल्लेश अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात होती. या सर्व कलाकारांची सर्वोत्कृष्ट कलाकृती असलेला हा चित्रपट प्रेक्षक शनिवारी संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजवर पाहू शकतात. तसंच रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट घडवून आणण्यासाठी अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रसारित होणार आहे. कलाकारांच्या योगदानानं आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादानं संपन्न अशा कलाकृतींपैकी एक असणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला तब्बल ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत पण तरीही त्यातील अनेक दृश्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. कलाविश्वात विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या आणि असंख्या सिनेरसिकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच. कारण आजही या चित्रपटातील प्रत्येक दृश्य आणि संवाद आम्हाला तोंडपाठ आहे, असं अभिमानानं सांगणाऱ्यांचा आकडा आश्चर्यचकित करुन जातो. सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता. तेव्हा येत्या शनिवारी अशा या दोन सदाबहार चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी पाहायला विसरू झी टॉकीज.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ