सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मीडियाचे सामर्थ्य दाखवण्यासाठी सादर केले अद्वितीय व्हर्च्युअल प्रदर्शन
मुंबई, २४ जानेवारी २०२१: कोविड-१९ महामारीदरम्यान मुंबईच्या गरीब पार्श्वभूमी असलेल्या मुलांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधील बीएमएम विद्यार्थ्यांसोबत सहयोगाने योग्य करिअर निवड करण्यासाठी त्यांच्या अध्ययनांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण केली.
नेल्सन मंडेला यांच्यानुसार,''शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र/साधन आहे, जे तुम्ही जग बदलण्यासाठी वापरू शकता!'' आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त या शब्दांना आचरत सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकॅडमीने सेंट झेवियर्स कॉलेजच्या मास मीडिया विभागासोबत सहयोगाने अद्वितीय व्हर्च्युअल प्रदर्शन #Education Beyond Books चे आयोजन केले आहे. महामारीमुळे अध्ययन व अध्यापन पद्धतीमध्ये डिजिटायझेशन बदल झाला असल्यामुळे एनजीओला थीम 'ई-लर्निंग - ए कॅटालिटिक ट्रान्झिशन'सह प्रदर्शन ऑनलाइन घेण्यास प्रेरणा मिळाली. गेल्या वर्षी सुरू झालेला उपक्रम परस्पदसंवादी अध्ययन अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला. हा उपक्रम खाजगी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मीडियाचे सामर्थ्य समजण्यामध्ये मदत करतो आणि योग्य करिअर निवड करण्यासाठी प्रेरित करतो.
भारतातील माध्यमिक शिक्षणाचे महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण. मानव संसाधन व विकास मंत्रालयाच्या मते भारतातील ३६.३७ टक्के गळतीचे प्रमाण इयत्ता आठवीमध्ये होते (एज्युकेशनल स्टॅस्टिटिक्स अॅट ए ग्लान्स, २०१४). सध्याची शैक्षणिक प्रणाली विद्यार्थ्यांना संबंधित करिअर्ससाठी सुसज्ज करत नसल्यामुळे विद्यमान स्किलिंग इकोप्रणाली शाळेमधून गळती झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटचा आधार म्हणून लघुकालीन कौशल्य विकास करण्यावर लक्ष केंद्रित करते. सलाम बॉम्बे फाऊंडेशनने ही आव्हाने ओळखली आहेत आणि त्यांना समजले आहे की शिक्षणासोबत रुजवण्यात आलेली कौशल्ये संधी देतात, महत्त्वाकांक्षा विकसित करतात आणि विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेमध्ये उपस्थित राहत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहित करतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण सादर करण्यामागील आणखी एक प्रमुख पैलू म्हणजे त्यांना कामामध्ये यशस्वीपणे सामावून जाण्याकरिता संबंधित कौशल्ये निर्माण करण्यास मदत करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना संप्रेषण, समस्या निवारण, निर्णय घेणे आणि डिजिटल विश्वाशी सामना करण्याची क्षमता अशा कौशल्यांची माहिती करून दिली पाहिजे. हे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत,जे कंपन्या उमेदवारांमध्ये पाहतात.
या व्हर्च्युअल प्रदर्शनाबाबत बोलताना प्रोजेक्ट्सच्या (आर्टस्अॅण्ड मीडिया) उपाध्यक्षा श्रीमती. राजश्री कदम म्हणाल्या,''या उपक्रमाचा तरूण विद्यार्थ्यांना मीडिया सारख्या क्षेत्रांमध्ये करिअर संधींचा शोध घेण्यास प्रेरित करण्याचा संकल्प आहे. ही क्षेत्रे उत्साहवर्धक असण्यासोबत आकर्षक संधी देखील देतात. खाजगी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्राबाबत माहिती मर्यादित आहे. त्यांनी पत्रकारांना टेलिव्हिजनवर पाहिले आहे आणि वर्तमानपत्रे वाचली आहेत. पण, त्यांनी मीडियाचा अभ्यास करण्याचा किंवा या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याचा विचार केलेला नाही आणि त्यांचा दृष्टिकोन पूर्णत: बदलण्याचा या उपक्रमाचा मनसुबा आहे. हा त्यांना मीडियाचे सामर्थ्य समजण्यामध्ये व प्रशंसित करण्यामध्ये मदत करण्याचा आणि योग्य करिअर निवड करण्याचा परस्पदसंवादी अध्ययन अनुभव आहे.”#Education Beyond Books” चे समाजाच्या विविध स्तरातील खाजगी शैक्षणिक संस्था, तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यावर आणि मीडिया सारख्या क्षेत्रांबाबत अधिक माहिती करून घेण्यास प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित आहे.''
शिक्षण व कौशल्य विकासाचे महत्त्व जाणून घेत सलाम बॉम्बे फाऊंडेशन त्यांचा व्यावसायिक कौशल्य विकास उपक्रम प्रोजेक्ट रिझ्यूमच्या माध्यमातून पोकळी भरून काढत आहे. हा उपक्रम अधिकृत माध्यमिक अनुदानित शाळा यंत्रणेमध्ये सुरू आहे आणि फाऊंडेशनचे चार प्रमुख व्यावसायिक कौशल्य विकास उपक्रम आहेत-मीडिया अकॅडमी, अकॅडमी ऑफ दि आर्टस्, स्पोर्टस् अकॅडमी आणि skills@schoolप्रोग्राम.
सलाम बॉम्बे फाऊंडेशनची मीडिया अकॅडमी विद्यार्थ्यांना व्यासपीठ व आवाज या दोन महत्त्वपूर्ण साधनांसह सुसज्ज करते आणि तरूण किशोरवयीन मुलांना संधींचा शोध घेण्यामध्ये व त्यांच्या अमर्यादित क्षमतांवर विश्वास ठेवण्यामध्ये मदत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. हा सर्वोत्तम तीन वर्षांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पत्रकारिता, फोटोग्राफी, प्रिंट प्रॉडक्शन व डिझाइनमध्ये प्रशिक्षण देतो आणि त्यांना प्रबळ कम्युनिकेशन, लेखन व इंटरपर्सनल कौशल्ये विकसित करण्यामध्ये मदत करण्यासोबत क्षमतापूर्ण व्यवसाय म्हणून मीडियाची ओळख करून देतो. ऑनलाइन प्रदर्शन हिंदी व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. या प्रदर्शनामध्ये प्रिंट मीडिया, रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया, पब्लिक रिलेशन्स, फोटोग्राफी व फिल्म मेकिंगमधील लाइव्ह स्टॉल्स व वेबिनार्सचा समावेश आहे. तसेच लाइव्ह चॅट कॉर्नर देखील असणार आहे, जेथे सहभागी क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती पाहू शकतात. २४ जानेवारी २०२१ रोजी सुरू झालेले हे प्रदर्शन मार्च २०२१ अखेरपर्यंत सुरू राहणार आहे आणि sbfmediaexhibition.com येथे उपलब्ध होऊ शकते.
Comments
Post a Comment