होम ऑटोमेशन सिस्टम
१० वर्षीय मुलाने डिझाइन केली विकलांगांना दैनंदिन आयुष्यात सहाय्य करणारी होम ऑटोमेशन सिस्टम
मुंबई, जानेवारी २०२१: इलेक्ट्रॉनिक्स/उपकरणे स्विच ऑन तसेच ऑफ करण्यासारखी एरवी साधी वाटणारी कामे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कशी करत असतील याचा कधी विचार केला आहे? वीर बविशी या मुंबईत राहणा-या १० वर्षांच्या इनोव्हेटरने शारीरिकदृष्ट्या विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक होम ऑटोमेशन सिस्टम डिझाइन केली आहे. ‘मेकर मेला’ या आशियातील सर्वांत मोठ्या मेकर गॅदरिंगच्या सहाव्या पर्वामध्ये सहभाग घेणारा तो सर्वांत लहानवयीन सदस्य आहे. सोमय्या विद्याविहार आणि सोमय्या ट्रस्ट यांच्या पुढाकाराने रिड्लद्वारे आयोजित केला जाणारा मेकर मेला हे जगभरातील नवोन्मेषकारी काम करणा-यांसाठी अव्वल दर्जाचे व्यासपीठ आहे.
वयोवृद्ध तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना दैनंदिन आयुष्यातील मूलभूत कामे करताना येणा-या अडचणी बघून त्यावर उपाय शोधण्याची प्रेरणा वीरला मिळाली. या व्यक्तींना मूलभूत तसेच घरात नेहमी वापरल्या जाणा-या उपकरणांचे तसेच इलेक्ट्रॉनिक्सचे नियंत्रण त्यांच्या मोबाइल फोनद्वारे करता यावे यासाठी वीर होम ऑटोमेशन प्रकल्पाच्या माध्यमातून एका आयओटी आधारित कार्यक्रमावर काम करत आहे. विकलांग तसेच वयोवृद्ध व्यक्ती स्वयंपूर्ण असाव्यात आणि इलेक्ट्रॉनिक्सचे स्विचेस ऑफ/ऑन करण्यासारख्या साध्या कामांसाठी त्यांना अन्य व्यक्तींवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, असे १० वर्षांच्या वीरला वाटत होते.
मेकर मेलाचे सहावे पर्व २३ आणि २४ जानेवारी २०२१ रोजी होत असून, यामध्ये जगभरातील लोक विस्तृत कक्षेतील नवोन्मेष घेऊन सहभागी होतील, असे अपेक्षित आहे. कला, हस्तकला, इंजिनीअरिंग, विज्ञान आणि डू-इट-योरसेल्फ (डीआयवाय) मानसिकतेला उत्तेजन देणारा मेकर मेला हे समविचारी व्यक्तींसाठी व्यासपीठ आहे. वैविध्यपूर्ण नव्या, अनोख्या व अपारंपरिक कल्पनांना येथे मूर्त स्वरूप दिले जाते. या व्यासपीठाचे उद्दिष्ट व्यक्तींना व आपले भवितव्य बदलू शकतील अशा पद्धतीने आकार घेणा-या प्रकल्पांना परस्परांशी जोडणे हे आहे. यातूनच नवोन्मेषकारी समुदायाला मेकर मूव्हमेंटचा परिचय करून दिला जातो, शिक्षणाची कल्पना नव्याने मांडली जाते आणि आपले भविष्यातील आयुष्य, काम व अध्ययन यांना आकार देणारे नवोन्मेषकारी तंत्रज्ञान विकसित केले जाते.
Comments
Post a Comment