आकाशाला गवसणी घालणाऱ्या 'अनन्या’चा टीझर प्रदर्शित

प्रताप फड  दिग्दर्शित 'अनन्या' हा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून हा यात अनन्याचा प्रवास दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे. 

एम. कॅाममध्ये गोल्ड मेडल पटकावलेली अनन्याचा स्वतःची काही स्वप्नं आहेत, आयुष्यात काही ध्येय आहेत. तिला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. आयुष्याकडे सकारात्कतेने बघणाऱ्या अनन्याचा तिच्या नावाप्रमाणेच अनन्यसाधारण असा प्रवास यात दिसत आहे. 

दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "यापूर्वी ‘अनन्या’ रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. मात्र चित्रपट करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नाटक पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. वयोगट आहे. तर तरूणाई चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित होते. ‘अनन्या’ हा असा विषय आहे. जो कधीही जुना होणार नाही आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा चित्रपट आहे. चित्रपट करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे नाटक करताना काही मर्यादा येतात. चित्रपट करताना बरीच मुभा असते. त्यात भव्यता आणू शकता. या ‘अनन्या’लाही प्रेक्षक तसेच भरभरून प्रेम देतील. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट अतिशय भव्य स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय.’’ 

प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या'  या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शक प्रताप फड यांनी केले आहे.  ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable