दृष्टी कडून मुंबई किनारपट्टीवरील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा या सहा पर्यटकांची गर्दी असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक सेवा 

 

मुंबईत जून ते सप्टेंबर या मान्सून महिन्यांसाठी मार्गदर्शक सुचना जारी

 

नैऋत्य मान्सून मुंबईच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत मुंबईच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

 

दृष्टी लाइफसेव्हिंग या बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) ने नियुक्त केलेल्या व्यावसायिक जीवरक्षक एजन्सीने मान्सून मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळ्यात समुद्रात जाऊ नये असे निर्देश यात दिले आहेत. 

 

महाराष्ट्र शासन दरवर्षी जून ते ऑगस्ट या पावसाळ्याच्या काळात समुद्र किनारे सर्व कामांसाठी बंद ठेवते कारण या हंगामात समुद्र अत्यंत खवळलेला आणि रौद्र असतो. या काळात 61 दिवसांची वार्षिक मासेमारी बंदी लागू आहे. या बंदी काळात संपूर्ण कालावधीत ट्रॉलर या परिसरातल्या समुद्रातून त्यांची जाळी काढून घेतात.

 

IMD नुसार, मुंबईत काही ठिकाणी वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात संपूर्ण शहरात हलक्या सरींनी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. मान्सून सुरू झाल्यानंतर शहरात जोरदार वारे आणि गडगडाटासह पाऊस पडू शकतो. दृष्टी लाइफसेव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड ची नियुक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) आणि मुंबई अग्निशमन दलाने जानेवारी 2019 मध्ये मुंबई किनारपट्टीवरील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि सर्वात लोकप्रिय गोराई या सहा पर्यटकांची गर्दी असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक सेवा प्रदान करण्यासाठी आणि समुद्रकिनारा सुरक्षा व्यवस्थापन करण्यासाठी केली आहे.

 

आगामी मान्सून आणि सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे, दृष्टीच्या देखरेखीखाली सर्व सहा समुद्रकिनाऱ्यांवर लाल झेंडे लावण्यात आले आहेत जे दर्शवितात की पाणी धोक्याच्या पातळी समकक्ष आहे.

दृष्टी लाइफसेव्हिंगचे ऑपरेशन्स हेड नवीन अवस्थी म्हणाले, “मुंबईत मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीवर हलक्या सरी पडत होत्या. त्यानुसार, आम्ही समुद्रकिनाऱ्यावरील अभ्यागतांना पावसाळ्यात समुद्रात जाऊ नये असा सल्ला देतो. आम्ही सर्व समुद्रकिनाऱ्यांवर लाल झेंडे लावले आहेत, याचा अर्थ हा परिसर पोहण्यासाठी नाही. पाण्यात उतरणे देखील योग्य नाही. समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या जीवरक्षकांची आमची टीम हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खडतर हवामानातही बचावकार्य करण्यासाठी आमच्या संघाला प्रशिक्षण मिळाले आहे.”

 

दृष्टीच्या - मुंबईच्या जीवरक्षक एजन्सीद्वारे पावसाळ्यासाठी सुरक्षा टिप्स

  • गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या सहा समुद्र किनार्‍यांना भेट देणार्‍यांनी प्रत्यक्ष समुद्राच्या पाण्यापासून किमान 10 मीटर अंतर ठेवावे आणि जीवरक्षकांनी दिलेल्या सूचना ऐकाव्या
  • पाणी कितीही उथळ असले तरीही आपले लक्ष नसताना लहान मुलांना पाण्यात जाऊ देऊ नका
  • विजा आणि गडगडाटाच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे किंवा पाण्यात जाणे योग्य नाही. अशा वेळी विज पडण्याचा धोका असू शकतो.
  • कमी भरतीच्या वेळी खडकांवर चढू नका कारण पावसाळ्यात खडक जास्त निसरडे आणि शेवाळलेले असतात.
  • जर मद्याच्या प्रभावाखाली असाल तर तुम्ही पाण्यात जाण्याची जोखीम बिलकुल घेऊ नका.
  • मास्क घाला आणि नेहमीच सामाजिक अंतर राखा


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable