एफसी गोवाकडून इडू बेडिया आणखी एका हंगामासाठी कायम 

स्पेनच्या फुटबॉलपटूचा गौर्ससाठीचा सलग सहावा हंगाम ~ 

१४ जून २०२२ एफसी गोवा क्लबने स्पेनचा फुटबॉलपटू इडू बेडिया याला आणखी एका हंगामासाठी कायम ठेवले आहे. या करारामुळे तो २०२३ हंगामातही ऑरेंज जर्सीमध्ये खेळताना दिसेल.  


बेडिया हा २०१७-१८ हंगामापासून एफसी गोवाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे आगामी हंगाम हा त्याचा गौर्ससाठीचा सलग सहावा हंगाम ठरणार आहे. मागील ५ हंगामात या स्पॅनिश मिडफिल्डरने १०२ सामने खेळताना १३ गोल केलेत. तसेच तितकेच गोल करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. करारात वाढ केल्याने इडू याने आनंद व्यक्त केला आहे.  


२०१७ पासून एफसी गोवा हे माझे घर बनले आहे. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत या क्लबचे मोठे स्थान आहे. त्यामुळे एफसी गोवाकडे मी एक क्लब म्हणून पाहत नाही. क्लबसह पदाधिकारी, सपोर्ट स्टाफ, सहकारी खेळाडू तसेच चाहते (फॅन्स) हे माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत. एफसी गोवासोबत आणखी एक हंगाम खेळता येणार असल्याचा मोठा आनंद आहे, असे बेडियाने कराराच्या पूर्ततेनंतर एफसीगोवाडॉटइनशी बोलताना सांगितले.  

एफसी गोवाचे प्रतिनिधित्व करताना क्लबसाठीचे काही महत्वपूर्ण विजय आणि जेतेपद यात सहभागी असल्याचा मोठा आनंद आहे. प्रत्येक हंगाम हा त्या त्या क्लबसह प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा असतो. आगामी हंगाम एफसी गोवासाठी संस्मरणीय ठरावा, असे मला वाटते. आयएसएल लीगमध्येही एफसी गोवा टीम टॉप टीममध्ये राहील, असा माझा विश्वास आहे. संघाला कायम विजय मिळवून देण्यात टीमला टॉप ठेवण्यात मी सर्वतोपरी योगदान देईन, असे इडू याने म्हटले आहे.  

एफसी गोवाचे फुटबॉल डायरेक्टर रवी पुस्कुर यांनी बेडिया याच्या करारवाढीचे समर्थन केले आहे. इडू हा गेले पाच हंगाम एफसी गोवासाठीचा महत्त्वपूर्ण घटक राहिला आहे. क्लबची ध्येय-धोरणे आणि फिलॉसॉफीशी त्याने स्वतःला चांगले जुळवून घेतले आहे. मागील दोन हंगामात तो एफसी गोवाचा प्रमुख खेळाडू म्हणून आहे. त्याने त्याची योग्यता आणि उपयुक्तता सिद्ध केली आहे. यंदाच्या हंगामात एफसी गोवाने कोचिंग तसेच सपोर्ट स्टाफमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात बेडिया याचा टीममधील समावेश आमच्यासाठी असेट असेल, असे पुस्कुर यांनी म्हटले. इडू याचा अनुभव क्लबसाठी मोलाचा ठरेल, असेही त्यांना वाटते.  

एक अनुभवी खेळाडू म्हणून आम्हाला इडूकडून खूप अपेक्षा आहेत. तो नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करेल. शिवाय त्याचा अनुभव सांघिक खेळ उंचावण्यासाठी जमेची बाजू ठरेल, असे पुस्कुर यांनी पुढे सांगितले.  

रेसिंग सॅनटाडर, यूडी सलमंका, हर्क्युलस एफसी, बार्सिलोना बी, १८६० म्युनिच, रेयाल ओव्हिडो आणि रेआल झाराझोगा अशा स्पेनमधील प्रसिद्ध क्लबसोबत खेळल्यानंतर बेडिया हा २०१७-१८ हंगामात एफसी गोवा क्लबसोबत जोडला गेला.  

एफसी गोवाकडून मागील चार हंगामात इडू हा क्लबच्या अनेक चांगले क्षण, आणि घटनांचा साक्षीदार आहे. त्यात एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील कामगिरीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या लीगच्या गटवार साखळीत त्याने भारताच्या लीगकडून पहिला गोल नोंदवला. हा गोल आजही सर्वांच्या लक्षात आहे.  

मागील आयएसएल हंगामात एफसी गोवाची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. पुढील हंगामासाठी नवी व्यूहरचना करताना कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमध्ये बदल केले आहेत. अनेक प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. इडू ही त्यापैकीच एक आहे. त्यामुळे नव्या बदलांसह एफसी गोवा क्लब पुढील हंगामात निश्चितच छाप पाडेल, याची सर्वांना खात्री आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO