रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे रिलायन्स हेल्थ सुपर टॉप-अप पॉलिसी सादर - हेल्थ इन्श्युरन्सची पॉवर बँक

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे रिलायन्स हेल्थ सुपर टॉप-अप पॉलिसी सादरपरवडणाऱ्या किमतीत जास्त विमा संरक्षण उपलब्ध

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे 1 कोटी+ संरक्षणासह रिलायन्स हेल्थ सुपर टॉप-अप पॉलिसी सादर

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे रिलायन्स हेल्थ सुपर टॉप-अप पॉलिसी सादरया क्षेत्रातील अनेक लाभ केले उपलब्ध

मुंबई, 17 जुलै, 2021 रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडतर्फे (आरजीआयसीएल) आज रिलायन्स हेल्थ सुपर टॉप-अप विमा पॉलिसी सादर करण्यात आली. जेव्हा वैद्यकीय खर्च स्टँडर्ड संरक्षणापेक्षा जास्त होतो आणि कस्टमरच्या खिशातून होणारा खर्च वाढतोअशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या अपुऱ्या आरोग्यसेवा संरक्षणाची समस्या हाताळण्याचा या पॉलिसीचा हेतू आहे. रिटेल ग्राहकांसाठी या पॉलिसीची रचना करण्यात आली आहे आणि 18 ते 65 या वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते.

वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या परिस्थितीतरिलायन्स हेल्थ सुपर टॉप-अप हा या क्षेत्रातील आघाडीच्या लाभांसह आरोग्य विमा संरक्षण वाढविण्याचा परवडण्याजोगा मार्ग आहे. अवयव दात्याच्या खर्चापासून ते आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियांसारखे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणारे उपचार पॉलिसीच्या रकमेवर मर्यादा न येता पॉलिसी सुलभपणे घेता येतात. या पॉलिअंतर्गत जगभरात कव्हरेज, 5 लाखांपर्यंत हवाई अँब्युलन्स कव्हरलाखांपर्यंत मॅटर्निटी आणि कन्झ्युमेबल (एकदाच वापर करता येण्याजोग्या) वस्तू मिळतातहे दुर्मीळ लाभ आहेत.

रिलायन्स हेल्थ सुपर टॉप अप लाखांपासून ते 1.3 कोटींपर्यंत विमा संरक्षण मिळते.  कस्टमरनासाध्या हॉस्पिटलायझेशनच्या गरजा पुरविण्यासाठीही अपुऱ्या असलेल्या त्यांच्या कमी संरक्षण असलेल्या विमा पॉलिसींना टॉप अप करण्यासाठी ही पॉलिसी आर्थिक दिलासा देते. सध्या आरोग्य विमा नसलेले ग्राहकही हा सुपर टॉप-अप प्लॅन निवडू शकतात आणि पॉलिसीमध्ये निवड केल्यानुसार त्यांच्या स्वतःच्या खिशातून वजायोग्य रक्कम देऊ शकतात. वजायोग्य रकमेचे लाखांपासून ते 30 लाखांपर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार निवड करू शकतात. सुपर टॉप-अप पॉलिसी संरक्षण देण्यास सुरुवात करण्याआधी ग्राहकाकडून देण्यात येणारी वजायोग्य रक्कम विद्यमान बेस पॉलिसीमधून असेल किंवा त्या व्यक्तीच्या खिशातून असेल याची ग्राहकाला निवड करता येते.

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे कार्यकारी संचालक आणि सीईओ श्री. राकेश जैन म्हणाले, “गेल्या वर्षभराचा काळ प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होताकारण लोकांना अनिश्चित आरोग्य समस्यांमधून जावे लागले. आरोग्यसेवेची मागणी वाढल्यामुळे वैद्यकीय खर्च प्रचंड प्रमाणात वाढत जात असल्यामुळे आम्हाला जाणवले कीएक जबाबदार इन्श्युरन्स ब्रँड म्हणून आमच्या ग्राहकांची चिंता दूर करण्यासाठी आम्ही एका विशेष स्थितीत आहोत आणि म्हणूनच आम्ही ग्राहकांना रिलायन्स हेल्थ सुपर टॉप अप पॉलिसी उपलब्ध करून दिली. या पॉलिसीमुळे ग्राहकांना वाजवी किमतीत आवश्यक असलेले अतिरिक्त आर्थिक संरक्षण प्राप्त झालेज्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी विमा संरक्षण वाढू शकते.

रिलायन्स हेल्थ सुपर टॉप अप पॉलिसी व्यक्तीकडून किंवा फॅमिली फ्लोटरच्या आधारे 1, 2 किंवा वर्षांच्या कालावधीसाठी घेता येऊ शकते. लाँग टर्म अॅग्रिगेट डिडक्टिबल उपलब्ध करून देणारी ही या क्षेत्रातील पहिलीच पॉलीसी आहेज्यात वजायोग्य रक्कम 2-वर्षांच्या पॉलिसीसाठी एकदाच द्यावी लागतेजी इतर वेळी वार्षिक आवश्यकता असते. या पॉलिसीमध्ये दावामुक्त वर्षांनंतर वजायोग्य रक्कम हटविण्याचा आणि सुपर टॉप-अप पॉलिसी स्टँडर्ड आरोग्य विमा पॉलिसीमध्ये परिवर्तीत करण्याचा पर्याय मिळतो आणि त्यासोबत बाय-बॅक फीचरही मिळते. प्रथमच खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी या पॉलिसीमध्ये खास सवलतही देण्यात येते.

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सबद्दल

www.reliancegeneral.co.in

रिलायन्स जनरल इन्श्युरन्स ही कंपनी रिलायन्स कॅपिटलचा भाग असून ही भारतातील एक आघाडीची इन्श्युरन्स कंपनी आहे. या कंपनीतर्फे मोटर विमाआरोग्य विमाप्रवास विमा आणि गृह विमा इत्यादी वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रोडक्ट्स ऑफर करण्यात येतात आणि प्रत्येक ग्राहकाची गरज भागविण्यासाठी सानुकूल उपाययोजना उपलब्ध करून देण्यात येतात. रिलायन्स जनरल इन्श्युरन्सची प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देण्यासाठी आणि रिटेलकॉर्पोरेट व एसएमई क्लाएंट्सना सेवा प्रदान करण्यासाठी भारतभरातील 129 शाखा कार्यालयांमध्ये 50,000 हून अधिक मध्यस्थांचे विस्तृत नेटवर्क आहे.

 

High Resolution Brand Logo

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार