शेमारू मराठीबाणा वाहिनीवर ‘बॉलीवूड धमाका’

लोकप्रिय विनोदी बॉलीवूडपटांची मराठमोळी मेजवानी


सध्या सर्वत्र करोनाने घातलेले थैमान बघता प्रत्येकाला हास्याचा डोस देण्याची आवश्यकता आहे. हास्याचा हा डोस प्रत्येकाचं टेन्शन हलकं करत जगण्याची ऊर्जा कैकपटीने वाढवणार आहे. सध्याच्या काळात या डोसची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन शेमारू मराठीबाणा वाहिनीने बॉलीवूडच्या कॉमेडी चित्रपटांचा अस्सल फिल्मी नजराणा प्रेक्षकांसाठी आणला आहे. मनोरंजनाला आता भाषेची अट नाहीआणि म्हणूनच बॉलीवूडचे गाजलेले तुफान विनोदी चित्रपट प्रेक्षकांना शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीवर आपल्या मराठी भाषेत पाहता येणार आहेत. त्यामुळे हास्याचा आणि आपल्याच भाषेत चित्रपटाचा आनंद घेण्याचा हा डबल बुस्टर प्रेक्षकांचे ‘पैसा वसूल’ मनोरंजन करणार हे नक्की.

 

ऑगस्ट महिन्याच्या सलग ३ रविवारी या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा आनंद सहकुटुंब घेता येणार आहे. रविवार १ ऑगस्टला वेलकम (‘एक झिंगाट कॉमेडी’), रविवार ८ ऑगस्टला ‘फिर हेराफेरी (पुन्हा गडबड पुन्हा गोंधळ’) आणि रविवार १५ ऑगस्टला ‘भागमभाग‘ ('राडा झाला रे’) असे ३ लोकप्रिय चित्रपट दुपारी १२.०० वा. आणि सायं ७.०० वा. पाहता येतील. शेमारू मराठीबाणा वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या या चित्रपटांच्या निमित्तानेप्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या आवाजाची जादू मराठी मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आता  बॉलिवूडचे तारे  आपल्याला मराठीत हसवणार असल्याने हास्याचा धमाका प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक असेल त्यासाठी ऑगस्टचे तीन रविवार राखून ठेवत ‘बॉलीवूड धमाका’ मधील हास्याची बरसात अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी सज्ज व्हावे.  

प्रसारण - रविवार १ ऑगस्ट, रविवार ८ ऑगस्ट आणि रविवार १५ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. आणि सायं ७.०० वा. शेमारू मराठीबाणा वाहिनीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight