वेट मॅनेजमेंट हा लठ्ठपणावरील एकमेव पर्याय नाही  

भारतात झपाट्याने वाढणारी आरोग्य समस्या देते आहे धोक्याचा इशारा!

मुंबई, 19 जुलै 2021: लोकांनी न्यू नॉर्मल जीवनशैली आत्मसात केली असली तरीही वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल शिक्षण पद्धतीने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये अति खाणे, तणावामुळे अति खादाडपणा तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत. कोविड उद्रेकाने प्रत्येकाला चांगले आरोग्य, आहार आणि बळकट प्रतिकार शक्ती कमावण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे सुदृढता राखण्यावर तसेच घरीच आरोग्याची देखरेख ठेवण्याकडे कल राहिला.

 

भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान विकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. याचा अर्थ आपल्या लोकसंख्येच्या 30% व्यक्ती लठ्ठ असू शकतात. आयसीएमआर-इंडियाबी’ ने 2015 दरम्यान केलेल्या अभ्यासानुसार 135 दशलक्ष व्यक्ती लठ्ठपणा आणि वजन व्यवस्थापन समस्येने त्रस्त आहेत. डिसेंबर 2020 दरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या 5 व्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्व्हेक्षणानुसार, बहुसंख्य महिला लठ्ठपणाच्या विकाराने त्रस्त आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये ही आरोग्य समस्या वेगाने वाढते आहे.

 

आपल्यावर असलेल्या या भयंकर पडछायेचा समाचार घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर देखरेख आणि सुदृढतेच्या व्यवस्थापनेच्या अनुषंगाने अधिकाधिक संवाद निर्माण होणे आवश्यक आहे.

 

ओमरॉन हेल्थकेअर इंडिया’ चे एमडी श्री. मसानोरी मत्सुबारा म्हणाले कीलठ्ठपणाच्या समस्यांचे जीवनशैली विषयक विकारांशी मजबूत संबंध आहे. ज्यामुळे आपल्या आरोग्यनिगा यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. प्रामुख्याने वैयक्तिक स्तरावर प्रतिबंधात्मक आरोग्यनिगा व्यवस्थापन काळाची गरज असल्याचा निष्कर्ष यातून निघतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावीपणा तपासण्याकरिता वजन व्यवस्थापन हा मुख्य निकष असल्याचे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते. मात्र ते पुरेसे नाही. आपले बीएमआय, शरीराचे वयोमान, चरबीचे प्रमाण, स्नायूंची घनता इत्यादी इतर अनेक सूचक घटकांची शरीरातील हालचाल टिपणे महत्त्वाचे ठरते. आता हे घटक सहज आरामात घरबसल्या मोजणे शक्य आहे. बॉडी कम्पोजीशन मॉनिटर्स’ सारख्या देखरेख उपकरणामुळे हे शक्य होते.”  

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) म्हणजे शरीराच्या घनतेवरून लठ्ठपणाचा वेध घेता येतो. यामध्ये शरीरातील चरबी आणि गंभीर आरोग्य जोखमीचे चांगले सूचकबिंदू अंदाज नोंदवतात. भारतात शरीराचा बीएमआय 30 किंवा त्याच्यावर असल्यास लठ्ठपणा आणि 25-30 बीएमआय असल्यास अति वजन असण्यावर शिक्कामोर्तब होतो. आपल्या शरीरात कमरेच्या खालच्या भागातील अवयवांच्या भोवती जमलेली चरबी म्हणजे बीएमआय संबंधी चरबी होय. उच्च बीएमआय आणि सभोवती साठलेली चरबी म्हणजे हृदय रोग, उच्च रक्त दाब, श्वसनाच्या समस्या आणि अन्य विकारांना आमंत्रित करणारी भयंकर जोखीम ठरते. या सूचकांची माहिती आणि या घटकांचे व्यवस्थापन केल्याने अधिक प्रभावीपणे वजन व आरोग्य व्यवस्थापन शक्य होते.

 

ओमरॉन’ च्या वतीने बॉडी कंपोजिशन मॉनिटर्स सादर करण्यात आले. ज्याद्वारे उपभोक्त्याला त्याच्या एकंदर आरोग्याचे बीएमआय, घनतेच्या सभोवती जमलेली चरबी, सांध्यांचे स्नायू आणि तत्सम घटक काही सेकंदांत अगदी सहज जाणून घेणे शक्य होते. हे उपकरण अभिनव आणि उद्योग क्षेत्रातील एकमेव जपानी फोर पॉइंट, एट सेन्सर- आधारीत फूल बॉडी सेन्सिंग टेक्नोलॉजीने युक्त आहे. याशिवाय त्यात ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हीटी असल्याने उपकरणातून जमवलेली माहिती थेट ओमरॉन कनेक्ट ॲपवर पाठवता येते.

जगभरातील लोकांना आरोग्यपूर्ण आणि आरामदायक आयुष्याची जाणीव करून देण्यात मदत म्हणून ओमरॉन हेल्थकेअरने सातत्याने उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करून जगभरात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. घरच्या घरी सहज उपलब्ध असणारे घरगुती आरोग्य व्यवस्थापन कंपनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत आहे.

डब्ल्यूएचओ अनुसार जगभरात 1975 पासून लठ्ठपणा वाढण्याच्या वारंवारतेत 3 पटीने वृद्धी झाली. 2016 च्या आकडेवारी अनुसार18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 1.9 अब्जहून अधिक प्रौढ अति वजनदार तर त्यापैकी सुमारे 650 दशलक्ष लठ्ठ होते. 2020 च्या आकडेवारीनुसार 5 पेक्षा खालील वयाची जवळपास 39 दशलक्ष बालके लठ्ठ आढळून आली.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार