फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनीतर्फे महाराष्ट्रातील वंचित मुलांना ३०००हून अधिक साक्षरता संचांचे वाटप

मुंबई, १२ जुलै, २०२१ : फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने सामाजिक योगदान देण्यासाठी वंचित सामाजिक घटकांमधील मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि लॉकडाऊनमध्ये त्यांच्यात वाचनाची आवड रुजविण्यासाठी 'रूम टू रीड' या एनजीओशी हातमिळविणी केली. या भागीदारीच्या माध्यमातून कंपनी महाराष्ट्रातील १२ शाळांपर्यंत पोहोचली आणि पहिली ते पाचवी या इयत्तांमधील मुलांना ३०८९ साक्षरता संचांचे वाटप केले.

या संचांमध्ये गोष्टीची पुस्तके, लेखन स्वाध्याय वह्या, लेखन साहित्य आणि अॅक्टिव्हिटी कार्ड्सचा समावेश होता. या संचाच्या मदतीने कोव्हिड-१९च्या परिस्थितीत मुलांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी मदत झाली. या साक्षरता संचांमध्ये प्रत्यक्ष परिस्थितीनुसार बदल करण्यात आले आणि समजायला सुलभ व्हावे यासाठी हिंदी आणि मराठी भाषांमध्ये हे संच वितरित करण्यात आले.

फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर रुचिका वर्मा म्हणाल्या, "शिक्षण हा भविष्याचा विमा आहे, यावर आमचा दृढ विश्वास आहे. या अनपेक्षित परिस्थितीतही कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मागास पार्श्वभूमी असलेल्या मुलांना पुस्तके वितरीत केल्याने त्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करण्याकरिता प्रोत्साहन मिळेल. या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना भविष्याच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी मदत करणाऱ्या रूम टू रीडचे आम्ही आभारी आहोत."

रूम टू रीडचे कंट्री डायरेक्टर सौरव बॅनर्जी म्हणाले, "कोव्हिडच्या महामारीमुळे देशभरातील शिक्षणावर प्रचंड परिणाम झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या समस्येवर मात करण्यासाठी रूम टू रीडने अनेकविध उपाययोजना तयार केल्या आहेत. डिजिटल स्रोत उपलब्ध नसलेल्या मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी आम्ही मुलांना साक्षरता संचांच्या माध्यमातून स्वाध्याय साहित्य उपलब्ध करून दिले. प्रत्यक्ष काम करणाऱ्या सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या समन्वयाने हे संच पालकांना देण्यात आले. मुलांच्या शिक्षणासाठी मदत केल्याबद्दल आणि योगदान दिल्याबद्दल आम्ही फ्युचर जनरालीला धन्यवाद देतो."

फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडबद्दल

फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड हे भारतातील रिटेल ट्रेडमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणारा फ्युचर ग्रुप आणि १९० वर्षांपूर्वी स्थापन झालेला जागतिक पातळीवरील इन्श्युरन्स ग्रुप आणि जगातील ७० सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये मानांकन असलेला जनराली यांच्यातील जॉइंट व्हेंचर आहे. या कंपनीची स्थापना २००७ साली करण्यात आली आणि जोखमींचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करण्यासाठी व्यक्तींना आणि कॉर्पोरेट्सना रिटेल, कमर्शिअल, वैयक्तिक, ग्रामीण विमा उपाययोजना उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

जनराली ग्रुपचे उत्पादनांच्या विविध वर्गांमधील जागतिक पातळीवरील इन्श्युरन्स क्षेत्रातील कौशल्य आणि भारतीय रिटेल क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणणारा फ्युचर ग्रुप यांचा फ्युचर इंडिया जनरालीला फायदा होत आहे. या सेगमेंटमध्ये आपली विश्वासार्हता ठामपणे प्रस्थापित केल्यानंतर आणि आपल्या जेव्हीच्या दोन्ही भागीदारांच्या कौशल्याचा पुरेपूर फायदा करून घेत फ्युचर इंडिया जनराली ही एक टोटल इन्श्युरन्स सोल्युशन्स कंपनी झाली आहे. 

*फॉर्च्युन ग्लोबल ५०० रँकिंगनुसार (२०२०)

जनराली ग्रुपबद्दल

जनराली हे जागतिक पातळीवरील एक सर्वात मोठे विमा व मत्ता व्यवस्थापन पुरवठादार आहेत. १८३१ साली स्थापना झालेली ही कंपनी ५० देशांमध्ये कार्यरत आहे. २०२० सालातील त्यांचा एकूण प्रीमियम ७०.७ अब्ज पौंड इतका होता. त्यांचे एकूण ७२,००० कर्मचारी असून ते ६.५९ कोटी ग्राहकांना सेवा पुरवतात. युरोपमध्ये हा ग्रुप अग्रस्थानावर आहे आणि आशिया व लॅटिन अमेरिकेत त्यांचे अस्तित्व विस्तारत आहे. शाश्वततेची प्रतिबद्धता ही जनरालीच्या धोरणाला सक्षम करते. कस्टमरशी आयुष्यभरासाठी भागीदार होणे या महत्त्वाकांक्षेतून आणि त्यांच्या अतुलनीय वितरण नेटवर्कमुळे त्यांच्यातर्फे नावीन्यपूर्ण व ग्राहकानुरूप उपाययोजना उपलब्ध करून देण्यात येतात.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight