आंतरराष्ट्रीय टेनिसपटू 'विश्वजीत सांगळे' याच्या मार्गदर्शनाखाली 'Être La Bête' कार्यक्रम सुरळीत पार पडला

सध्या जगभरात ऑलिंपिकची चर्चा आहे. यात देशातील नवनव्या खेळ्यांविषयीची जनजागृती होत आहे. भारतात खेळाडूंना मार्गदर्शन करणा-या कंपन्यांची गरज फार उद्भवत आहे. आंतरराष्ट्रीय व्हेगन टेनिसपटू विश्वजीत सांगळे याच्या मार्गदर्शनाखाली 'एस्पेरर' ही स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी दोन वर्षांपूर्वी उदयाला आली. या कंपनीने तळागाळातील खेळाडूंसाठी 'Être La Bête' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी डिसीपी. अविनाश अंबुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 'Être La Bête' या कार्यक्रमाविषयी विश्वजीत सांगळे सांगतो, "आम्ही गेली दोन‌ वर्ष तळागाळातील खेळाडूंसाठी काम करत आहोत. त्यांना त्यांच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहन देत आहोत. या कंपनी द्वारे खेळाडूंना कशी संधी निर्माण होईल याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. क्षमता आणि गुणवत्ता असणा-या खेळाडूंसाठी ही कंपनी सर्वोतोपरी मदत करणार आहे."
पुढे तो म्हणतो, "मला मिळालेल्या यशात माझ्या घरच्यांचा मोठा वाटा आहे. तसेच 'एस्परर' हे माझं कुटुंब आहे. शिवाय इथे येणा-या प्रत्येकासाठी एक नवी आशा आणि दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम एस्परर करेल."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight