निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड (एनआयएमएफ) च्या वतीने निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड लॉन्च    

शुक्रवार, 23 जुलै 2021 : निप्पॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट (एनएएम इंडिया) या निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड (एनआयएमएफ)च्या असेट मॅनेजरने निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड लॉन्च’ ची घोषणा केली.

ही एक ओपन-एन्डेड डायनॅमिक इक्विटी स्कीम असून बाजारातील भांडवली उत्पादनांत एका छताखाली पर्याय उपलब्ध करून देते. निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड हा बाजार अंदाज आणि आकर्षकतेवर आधारित मोठ्या, मध्यम आणि छोट्या विविध पोर्टफोलियोत दीर्घकालीन भांडवली संधींद्वारे गुंतवणुकीला चालना देतो.   

न्यू फंड ऑफर (एनएफओ) 26 जुलै 2021 रोजी खुली होऊन 9 ऑगस्ट 2021 रोजी बंद होईल. हा फंड निफ्टी 500 टीआरआय विरुद्ध मापदंड ठरणार आहे. त्याकरिता रु 500 आणि त्यानंतर रु. 1 च्या पटीत किमान गुंतवणुकीची गरज राहील.

हा फंड बॉटम-अप स्टॉक सिलेक्शनद्वारे अल्फा निर्मितीचा प्रयत्न करणार असून उच्च वाढीकरिता पोषक संधी शोधण्याकरिता सुयोग्य वाटप पद्धत (अॅप्रोप्रीएट अलॉकेशन अप्रोच) अंगीकारण्यात येते. निप्पॉन इंडिया एमएफ हा भारताच्या खरेदी-बाजूवरील सर्वात मोठा आणि अनुभवी इक्विटी संशोधन पर्याय मानला जातो.    

मध्यम आणि छोट्या स्वरूपाच्या कॅप प्रकाराद्वारे देऊ करण्यात येणाऱ्या विकास संधींत किमान पर्यायांसह नेतृत्व उभारण्यासोबत निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड किफायतशीर वाटपाच्या साह्याने लार्ज कॅपमध्ये भांडवलाच्या दृष्टीने तुलनेने स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते आहे. सध्या हा फंड तंत्रज्ञान किंवा नियमन, ‘बॅक टू नॉर्मल’ किंवा व्यत्ययावर भरभराट झालेली नवीन बिझनेस मॉडेल, चीन अधिक एक किंवा आयात पर्याय इत्यादीमुळे प्रमुख क्षेत्रांतील एकत्रीकरण लाभार्थ्यांसमवेत डोमेस्टीक रिकव्हरी थीम्सच्या दिशेने पक्षपाती आहे.

या लॉन्च’वर बोलताना निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड’ चे को-चीफ बिझनेस ऑफिसर सौगता चटर्जी म्हणाल्या की, “निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड लॉन्चच्या माध्यमातून आमच्या विस्तृत गुंतवणूकदार-केंद्री उत्पादनांत भर पडली आहे आणि गुंतवणुकदार समुदायाला अधिकाधिक ऑफर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. फ्लेक्सी कॅप ही इक्विटी परिघातील सर्वात मोठी वर्गवारी आहे. नव्याने तयार झालेल्या फ्लेक्सी कॅप वर्गाखाली एकंदर एयुएम जून अखेरीपर्यंत रु. 1.76 ट्रिलीयन# याप्रमाणे राहिला. निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड समवेत बाजारातील भांडवलाच्या उत्तम परतावा देणाऱ्या उत्तम संधींत गुंतवणूक करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

या फंडचे व्यवस्थापन धृमील शहा, वरुण गोयंका आणि निखील रुंगटा (को-फंड मॅनेजर), किंजल देसाई, फंड मॅनेजर – ओव्हरसीज यांच्या समवेत मनिष गुणवानी, सीआयओ – इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स करणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार