बिसलरी हँड प्युरीफायर्स

व्यक्तिगत निगा विभागात बिसलरीचा प्रवेश; ‘हातावर प्रेम करणाऱ्यांसाठी बिसलरी हँड प्युरीफायर्सची नाविन्यपूर्ण मालिका सादर

·         जेल आणि बहुउद्देशीय स्प्रे प्रकारातील हँड प्युरीफायर्स. मॉईश्चरायझर आणि तजेलदार सुवासिक हँड प्युरीफायर्स देणार जंतूंपासून संरक्षण आणि कोरडेपणा पासून बचाव करत ठेवणार तुमचे हात मऊमुलायम

मुंबई, १६ जुलै .. २०२१: बिसलरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने व्यक्तिगत निगा विभागात प्रवेश करत बिसलरी हँड प्युरीफायर्स सादर करत असल्याचे जाहीर केले. बिसलरीने नेहमीच ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि आपल्या नवीन आरोग्य स्वच्छता साधनांच्या मालिकेतून विश्वासआरोग्य आणि सुरक्षितता या मुल्यांप्रती असलेली आपल्या ब्रँडची पत विस्तारली आहे. ग्राहक आता आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टींविषयी अधिकाधिक जागरूक होत असताना महामारीच्या सुरुवाती पासूनच सॅनिटायझर ही गरजेची गोष्ट बनली आहे. पण सातत्याने सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे ग्राहकांना त्वचेवर दुष्परिणाम दिसायला सुरुवात झाली. त्वचा कोरडी आणि खडबडीत व्हायला लागली. बिसलरी हँड प्युरीफायर्स ची मालिका ही नियमीत वापरासाठीच तयार करण्यात आली असून त्याद्वारे जंतूंपासून ९९.९% सुरक्षितता पुरविली जात आहे. जोडीला कोरडेपणा पासून बचाव करत तुमची त्वचा मऊमुलायम ठेवण्यासही मदत होणार आहे.

जेल आणि बहुउद्देशीय स्प्रे प्रकारातील बिसलरी हँड प्युरीफायर्सची मालिका वैयक्तिक वापराच्या आणि प्रवासातील विशेष गरजांची पूर्तता करते. कोरफडग्लीसेरॉल आणि ई-जीवनसत्वाने जेल समृद्ध आहे. त्यामुळे हात मॉईश्चराईज्ड आणि मुलायम राहायला मदत होते. जेल ५०,१०० आणि २०० मिली एसकेयू मध्ये उपलब्ध आहे. बहुउद्देशीय स्प्रे मालिकेतील घटक हे हात आणि सर्व प्रकारच्या पृष्ठ्भागांसाठी चालणार असून १०० आणि २०० मिली स्प्रे बाटल्यांमध्ये उपलब्ध आहेत.

बिसलरी हँड प्युरीफायर्स मध्ये वापरण्यात आलेले सुवासिक घटक हे विशेष तजेला देणारे आहेत. बिसलरी बाय द बे मधून ग्राहक समुद्राचा मन प्रसन्न करणारा सुवास अनुभवू शकतील, बिसलरी हॅलो सनशाईन मधून सायट्रसी गंध आणि बिसलरी लव्हली मधून फुलांच्या सुमधुर सुवासाची मजा घेऊ शकतील. सर्व प्रकारच्या नेहमीच्या सॅनिटायझर्सपेक्षा यांचे पॅकेजिंग खूप वेगळे आहे. महत्वपूर्ण पॅकेजिंग मधली ही उत्पादने वाजवी किमतीत उपलब्ध आहेत. त्वचेचे पोषण करणारे घटकआगळेवेगळी पॅकेजिंग रचना आणि सर्वोत्तम सुवासिक गंध यांनी तयार करण्यात आलेली ही उत्पादने बिसलरीच्या उपाध्यक्षा श्रीमती जयंती चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत करण्यात आली आहेत. ‘हातावरच्या प्रेमासाठी’ इतक्या साध्या सोप्या संदेशातून बिसलरी हँड प्युरीफायर्सच्या टीव्हीसीने आपल्या उत्पादनांचा वेगळेपणा मांडला आहे. सुरक्षितताकाळजी आणि पुन्हा एकदा टवटवी देताना आरोग्यपूर्ण स्वच्छतेचा अनुभव मिळत असल्याचे या टीव्हीसी मधून सादर होते. ही दृश्ये बघितल्यावर हे समजते की बिसलरी हँड प्युरीफायर्स केवळ सुरक्षितता पुरवत नाहीत तर आपले हात मऊमुलायमसुवासिक आणि टवटवीतही ठेवतात.

बिसलरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एन्जेलो जॉर्ज या सादरीकरणाच्या वेळी बोलताना म्हणाले, “वाढत्या आरोग्य आणि स्वच्छता विषयक जागरूकतेमुळे व्यक्तिगत स्वच्छता निगा विभागात मोठी उत्साहवर्धक वाढ होत आहे. आम्हालाही ग्राहक संशोधन केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की जंतूंपासून संरक्षण देण्याच्या पलीकडे जाऊन जोडीला मॉईश्चरायझेशन आणि सुवासिक तजेला देणाऱ्या उत्पादनांची ग्राहकांना गरज आहे. सर्वोत्तम प्रकारच्या पॅकेजिंग मधून हे सुधारित घटक देणारे बिसलरी हँड प्युरीफायर्स आम्ही विकसीत केले आहेत. देशभरातल्या आमच्या वितरण पोहोच यंत्रणेच्या मदतीने बिसलरी हँड प्युरीफायर्सची ही उत्साहवर्धक मालिका आघाडीच्या जनरल ट्रेड दालनातफार्मसीजआधुनिक ट्रेड दालने आणि इ-कॉमर्स साईट्स वर उपलब्ध आहे. जोडीला www.shop.bisleri.com येथूनही ग्राहकांना खरेदी करता येऊ शकेल.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight