ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाउंडेशन’ला आजीवन मदतीचा हात

मुंबई , 16 जुलै, 2021: ग्रँड मराठा फाऊंडेशन(GMF), या स्वयंसेवी संस्थेने सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ‘द मदर ग्लोबल फाउंडेशन’ समवेत भागीदारी केली असून याद्वारे आगामी काळात अनाथालय बांधण्याचे तसेच रु 50 लाखांच्या प्राथमिक दानाच्या माध्यमातून 650 अनाथ आणि इतरांना किराणा सामानाचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भागीदारीतून प्रत्येक केंद्राकरिता सुमारे रु. 2,50,000 च्या मासिक किराणा मालाची तजवीज करण्यात येईल. त्याचप्रमाणे द मदर ग्लोबल फाउंडेशन अंतर्गत जवळपास 500 गायींच्या चाऱ्याची सोय करण्यात येणार आहे.

उच्च शिक्षणाला प्रोत्साहित करण्याच्या परस्पर ध्येयानुसार, जीएमएफतर्फे २०० हून अधिक शेतकर्‍यांच्या मुलांना वित्तपुरवठा व खासगी कार्यालयात भरती केले गेले आहे.  द मदर ग्लोबल फाउंडेशनला ऑनलाईन शिक्षण आणि कौशल्य विकासाकरिता जीएमएफ संगणकांची मदत उपलब्ध करून देईल. त्याशिवाय द मदर ग्लोबल फाउंडेशनमधील प्रत्येक अनाथाच्या उदरभरणाची जबाबदारीही GMF उचलणार आहे. इतकेच नव्हे तर प्रशासकीय पाठबळ देणार आहे.

या भागीदारीविषयी बोलताना फिल्म प्रोड्यूसर आणि ग्रँड मराठा फाऊंडेशन’चे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले की, “आमच्या ग्रँड मराठा फाऊंडेशन आणि सौ सिंधुताई सपकाळ यांच्या ‘’द मदर ग्लोबल फाउंडेशन’’ चे उद्दिष्ट एकसमान आहे. पोषक आहार उपलब्ध करून देणे, मुलांना स्वावलंबी होण्याकरिता शिक्षणाचा प्रचार करणे, शेतकऱ्यांना साह्य करणे आणि महिलांचे पुनर्वसन अशा उद्दिष्टांचा धागा दोन्ही संस्थांमध्ये समान आहे. ही भागीदारी मुक्त स्वरुपाची आहे, त्यामुळे समाज कल्याणाची आशेसोबत सौ. सिंधुताई यांच्या आदर्श कार्यात त्यांना मदत उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होतो आहे.”   

डॉ. सिंधुताई सपकाळ या भारतात अनाथांचा आधारवड म्हणून ओळखल्या जातात. 2021 मध्ये त्यांना समाज सेवा वर्गवारीत पद्म श्री’ने गौरविण्यात आले. या भागीदारीविषयी बोलताना कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, “सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीत रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन’ने आम्हाला आवश्यक असलेले पाठबळ देऊ केल्याने आमच्याकडील समस्याग्रस्त आणि भुकेले 650 अनाथ, सुमारे 500 गाई आणि महाराष्ट्रातील अन्य जनावरांसाठी सुलभतेने कार्य करणे शक्य झाले आहे. रोहित यांनी ही भागीदारी उदार मनाने आणि नि:स्वार्थ वृत्तीने केली असल्याचा मला अभिमान वाटतो, आणि या भागीदारीच्या आधाराने द मदर ग्लोबल फाउंडेशनच्या छत्राखालील सर्व गरजूंना मदत मिळेल, सोबतच ते त्यांना हक्कांचे आयुष्य जगता येईल.”

 

ग्रँड मराठा फाउंडेशनविषयी:

ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठबळ पुरवले जातेत्यामध्ये आधुनिक तंत्राची योग्य किंमत समाविष्ट असून शेतकऱ्यांच्या पाठी लागलेले कर्ज व गरिबीचे दुष्टचक्र मोडीत काढून त्यांना चांगल्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने विशेष लक्ष हे विदर्भावर देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक साह्य देऊ करण्यात येतेत्याचप्रमाणे कृषी पट्ट्यात व ग्रामीण भागात शेतीपूरक कार्यक्रम राबवून विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शाळांना संगणक दान करून त्यांना ए लर्निंगची ओळख करून दिली जाते व त्यासाठी प्रोत्साहन दिल्या जाते..  हे फाऊंडेशन महाराष्ट्रातील अकोलाअमरावतीयवतमाळचंद्रपूर आणि नागपूर भागात शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना आगामी काळासाठी तयार करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांना नियमित आयुष्यात सतावणाऱ्या समस्या कमी करून त्यांचे जीवन समृद्ध करायचे आहे. या सत्कार्यात सहभागी होण्याकरिता खालील खात्यावर मदत करावी.

A/c name: GRAND MARATHA FOUNDATION

Bank name: HDFC BANK

Bank Account No.: 50200030319170

IFSC: HDFC0000146

Branch Name: TALAO PALI THANE

लिंकhttp://grandmaratha.org/

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार