या आठवड्यात पहा सारेगमप लिटिल चॅम्प्स 'गुरुपौर्णिमा' विशेष भाग

झी मराठीवर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली. १४ अफलातून लिटिल चॅम्प्स आणि त्यांचे भन्नाट सादरीकरण अगदी १ पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना थक्क करत आले आहेत. या प्रतिभावान लिटिल चॅम्प्सना मार्गदर्शन करणारे पंचरत्न यांच्यासाठी देखील या लिटिल चॅम्प्सना जज करणं कठीण जातंय यात शंका नाही.
येत्या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये गुरुपौर्णिमा विशेष भाग प्रेक्षक पाहू शकतील. इतकंच नव्हे तर हा विशेष भाग नवीन मंचावर होणार आहे. या भागाची सुरुवात पंचरत्न आणि सर्व लिटिल चॅम्प्सच्या दमदार परफॉर्मन्सने होणार आहे. या भागात सर्व लिटिल चॅम्प्स आपल्या गुरूला गाणं डेडिकेट करतील. त्यांच्या उत्तम सादरीकरणाने सर्व परीक्षकांसाठी परफॉर्मर ऑफ द वीक निवडणं कठीण होईल. या विशेष भागात कोण मिळवणार वरचा सां? कोणाला मिळणार गोल्डन तिकीट? कोण ठरणार परफॉर्मर ऑफ द वीक? हे पाहून औस्त्युक्याच ठरेल. 
त्यामुळे पाहायला विसरू नका सारेगमप लिटिल चॅम्प्सचा गुरुपौर्णिमा विशेष भाग गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight