'अभंग रिपोस्ट’चा स्वरनाद

‘आम्ही दादरकर’ आणि ‘वेध फाऊंडेशन’ आयोजित शोभायात्रेत 'अभंग रिपोस्ट’चा स्वरनाद

झी टॉकीजचा विशेष सहभाग

गुढीपाडवा... साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधरण महत्त्व आहे. नववर्ष शोभायात्रा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मुंबईत ठिकठिकाणी दिमाखात शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली परंपरा आहे. या शोभायात्रांची शान काही वेगळीच असते.

‘आम्ही दादरकर’ आणि ‘वेध फाऊंडेशन’ आयोजित शोभायात्रेत 'अभंग रिपोस्ट’ या तरुणाईच्या म्युझिकल ग्रुप बँडने आपल्या अनोख्या सुरावटींनी उपस्थितांची मने जिंकली. झी टॉकीज चा विशेष सहभाग असलेल्या या शोभायात्रेत वेगवेगळ्या भागातून आलेले असंख्य तरुण वारकरी सहभागी झाले होते. पारंपारिक वेषभूषेतील लहान मुले, मल्लखांब या मराठमोळ्या खेळाचे सादरीकरण, लेझीम पथकाचे सादरीकरण, ढोलताशा पथक, घोडयावरून मिरवणूक अशा वेगवेगळया सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable