१८ नोव्हेंबर ला 'सनी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

१८ नोव्हेंबर ला 'सनी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला... 

गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर ला 'झिम्मा'ने लोकांना वेड लावले होते तर या वर्षी पुन्हा त्याच शुक्रवारी ‘सनी' लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'झिम्मा' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर  हेमंत ढोमे यांचा ‘सनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झिम्मा' नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावल्या आहेत. प्रेक्षकांच्या हयाच अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी बरोबर एक वर्षांनी 'सनी'  हा सिनेमा १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर यात 'सनी'ची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ह्या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी  केले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते असून सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केलेले आहे. 

दिग्दर्शक हेमंत ढोमे सिनेमाबद्दल म्हणतात, " 'झिम्मा' ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने ‘सनी' हा सिनेमा घेऊन आलोय. आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे 'झिम्मा'ला प्रेम दिले तसेच ते 'सनी'ला हि मिळेल अशी खात्री आहे. "

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO