पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर करणार उंच माझा झोका पुरस्कार २०२२ चे निवेदन
पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर करणार उंच माझा झोका पुरस्कार २०२२ चे निवेदन
झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. ह्या वर्षी देखील मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका' या नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे . 'उंच माझा झोका' पुरस्काराचे यंदाचं हे आठव वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. ह्यावर्षीच्या पुरस्काराचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत. पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका 'उंच माझा झोका' पुरस्कार २०२२ झी मराठी वर २८ ऑगस्टला संध्याकाळी ७ :०० वाजता.
Comments
Post a Comment