एण्‍ड टीव्‍ही घेऊन येत कौटुंबिक मालिका 'दूसरी मॉ’

एण्ड टीव्ही घेऊन येत आहे कौटुंबिक मालिका 'दुसरी माँ' आई-मुलाचे नाते शाश्‍वत, नि:स्‍वार्थ, प्रबळ आणि बिनशर्त प्रेमावर आधारित असल्‍याचे मानले जाते. मातृत्‍व प्रेम व आपुलकीला कोणतीही बंधने नसली तरी ते जटिल असू शकते, विशेषत: तो मुलगा तुमच्‍या पतीचा अवैध मुलगा असतो तेव्‍हा अनेक प्रश्‍न निर्माण होतात. आणि नशीब तुम्‍हाला त्‍या मुलासोबत एकाच छताखाली आणते तेव्‍हा काय घडते? अशीच काहीशी यशोदा व कृष्‍णाची कथा आहे, ज्‍यांना नशीब एकत्र आणते आणि त्‍यांच्‍या जीवनाला नकळतपणे कलाटणी मिळते.

एण्‍ड टीव्‍ही नवीन कौटुंबिक मालिका 'दूसरी मॉं' सादर करण्‍यास सज्‍ज आहे. ही उत्तर प्रदेशमध्‍ये राहणा-या एका महिलेची कथा आहे, जी तिचे पती, दोन मुली व सासरच्‍या माणसांसोबत आनंदाने राहत असते. पण ती आणि तिचा पती नकळतपणे त्‍याच्‍या अवैध मुलाला दत्तक घेतात, तेव्‍हा त्‍यांचे आनंदी व शांतमय कौटुंबिक जीवन अस्‍ताव्‍यस्‍त होऊन जाते. या मालिकेची निर्मिती झी स्‍टुडिओजने व सह निर्माते इम्तियाज पंजाबी ह्यांनी केली आहे.

https://www.instagram.com/reel/ChcONdKO7Gz/?igshid=YmMyMTA2M2Y=

अधिक जाणण्‍यासाठी चॅनेल पाहत राहा, मालिका 'दूसरी मॉं' लवकरच सुरू होत आहे फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO