नेटाफिम इंडियातर्फे आजच्या युगातील शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी पोर्टेबल ड्रिप कीट सादर

या कीटच्या माध्यमातून 10,000 हेक्टर जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचे आणि आगामी वर्षात

25,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे

वाजवी किमतीतीलऑल-इन-वन नेटाफिम सिंचन उपाययोजना अनेक उत्पादने एका छत्राखाली आणतात आणि

इन्स्टॉलेशन खर्च वाचविणारी मोड्युलर यंत्रणा उपलब्ध करून देतात ~

मुंबई1ऑगस्ट 2021: नेटाफिम इंडिया या आघाडीच्या स्मार्ट सिंचन उपाययोजना पुरवठादारातर्फे पोर्टेबल ड्रिप कीट सादर करण्यात आले आहेहे सर्वसमावेशक ऑल-इन-वन सिंचन उपाय  असून ते इन्स्टॉल करण्यास सोपे आहे आणि वाजवी किमतीला उपलब्ध आहेहे कीट  विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहेज्यांच्याकडे 1 एकरहून कमी जमीन आहेहे कीट  अतिरिक्त मजुरांशिवाय इन्स्टॉल करता येऊ शकतेनेटाफिमच्या डीलर नेटवर्कच्या माध्यमातून पोर्टेबल ड्रिप किट भारतभर उपलब्ध करण्यात आले आहेहे कीट  सर्व भाजीपाला पिकेवेलवर्गीय भाज्याओळीत जवळ लावण्यात येणाऱ्या अशा सर्व रब्बी  आणि खरीप पिकांसाठी  उपयुक्त आहे.

पोर्टेबल ड्रिप कीट लाँच करून 10,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे आणि आगामी वर्षात भारतातील 25,000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहेमहाराष्ट्रामध्ये कंपनीला अतिरिक्त 5% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहे आणि ~2000 हेक्टर शेतजमीन ठिबक सिंचनाखाली आणायची आहे.

आजच्या युगातील शेतकऱ्यांच्या कामकाजासंबंधीच्या आणि पर्यावरणीय वैविध्यपूर्ण गरजा हाताळण्यासाठी एकाच छताखाली असलेल्या विविध नेटाफिम यंत्रणा असलेले हे कीट वापरण्यास सोयीचेहलक्या वजनाचे आणि सहज हलवता येणारे असून ते शेतकऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांची पूर्तता करते४५०० चौमी.  जमिनीच्या सिंचनाच्या दृष्टीने रचना करण्यात आलेली ही सर्व उत्पादने आणि सुटे भाग सहज इन्स्टॉल करता येतात आणि वापरानंतर सोयीच्या साठवणुकीच्या जागी नेता येऊ शकतातत्याचप्रमाणे या कीटमध्ये आधुनिक टिकाऊ ड्रिपर्स वापरण्यात आले आहेतजे उत्तम कामगिरी बजावतात.

फ्लेक्सनेटTM हा या कीटचा  महत्त्वाचा भाग आहेहा अत्यंत आधुनिकगळतीमुक्त लवचिक मेनलाइन आणि विवधांगी पाइपिंग उपाय  आहेज्यामुळे  काटेकोर  जल वाटप (प्रिसाइझ वॉटर डिलिव्हरीहोते आणि पाण्याची बचत वाढते तसेच वाढीव सिस्टिम कामगिरीमुळे पिकाची उत्पादकताही  सुधारतेयाच्या पेटंट केलेल्या आउटलेट्समुळे आणि पाइपमुळे पाण्याची गळती होत नसल्याने चिखल होत नाही  तण वाढत नाही.  त्यामुळे अनेक वर्ष उत्तम कामगिरीची हमी मिळतेयात नेटाफिम यंत्रणेशी सुसंगत असलेले  लॅटरल कनेक्टर्स पुरविण्यात येतातपांढऱ्या रंगामुळे उष्णतेला प्रतिबंध केला जातो आणि उच्च रासायनिक आणि अतिनील किरणांमध्येही ही यंत्रणा तग धरून राहते.

या नावीन्यपूर्ण उत्पादनाबद्दल नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीरणधीर चौहान म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी शेती प्रक्रिया सुलभ करण्यावर नेटाफिम इंडिया आपली ऊर्जा केंद्रीत करते आणि त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सक्षम करतेभारतातील अनेक शेतकऱ्यांकडे   एकरहून कमी जमीन आहेयाची आम्हाला जाणीव आहेअशा परिस्थितीमुळे पिक घेणे ही प्रक्रिया त्यांच्यासाठी धाडसी आणि आव्हानात्मक असतेखर्चमजुरी कमी करून आणि पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने करत वाढीव पिक क्षमता  उत्पादकतेसाठी छोटे क्षेत्र असणाऱ्या  शेतकऱ्यांना सुविधाजनक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या नेटाफिमच्या प्रयत्नांचे पोर्टेबल ड्रिप कीट  हे फलित आहे."

शेतातील इन्स्टॉलेशन आणि कामकाजासाठी आवश्यक असलेले सर्व भाग पोर्टेबल ड्रिप कीटमध्ये उपलब्ध आहेतयात स्क्रीन फिल्टरफ्लेक्सनेट पाइपड्रिपलाइन  कनेक्टर्स यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight