पेटीएम

२ कोटी व्‍यापारी आणि ३३ कोटी ग्राहकांचे नेटवर्क असलेली पेटीएम बनली भारतीय कुटुंबांच्‍या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग  

भारताचे आघाडीचे आर्थिक सेवा प्रदाता व्‍यासपीठ पेटीएमने आज घोषणा केली की, त्‍यांनी देशामध्‍ये प्रबळ डिजिटल आर्थिक पेमेण्‍ट्स पायाभूत सुविधा निर्माण करत २ कोटींहून अधिक व्‍यापारी, तसेच ३३ कोटी युजर्सना सक्षम केले आहे. कंपनीने वर्षानुवर्षे लाखो कुटुंबांना डिजिटल पेमेण्‍ट्ससह सक्षम केले आहे. पेटीएम पेटीएम उत्‍पादने व सेवा जसे पेटीएम ऑल-इन-वन क्‍यूआर, पेटीएम ऑल-इन-वन पीओएस, पेटीएम साऊंडबॉक्‍स अशा व्‍यापक श्रेणीसह रस्‍त्‍यावरील लाखो फेरीवाले, लहान दुकानदार, टक शॉप मालकांसाठी डिजिटल पेमेण्‍ट्समध्‍ये क्रांती घडवून आणण्‍यास साह्यभूत राहिली आहे. कंपनीच्‍या सेवांनी लोकांमध्‍ये डिजिटल पेमेण्‍ट्सबाबत विश्‍वास निर्माण करण्‍यामध्‍ये, तसेच शासनाच्‍या 'आत्‍मनिर्भर डिजिटल भारत' उपक्रमाला अधिक चालना देण्‍यामध्‍ये मदत केली आहे.   

कंपनीने देशभरात प्रबळ तंत्रज्ञान पायाभूत सुविधा निर्माण केल्‍या आहेत. कंपनी डिजिटल गावे निर्माण करण्‍यासोबत त्‍यांचा विस्‍तार करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे आणि तेथील व्‍यापा-यांना प्रशिक्षित केले आहे, ज्‍यामुळे ऑनलाइन व्‍यवहारांमध्‍ये वाढ होण्‍यास मदत झाली आहे.  

पेटीएम ऑल-इन-वन क्‍यूआर व्‍यापा-यांना शून्‍य टक्‍के शुल्‍कामध्‍ये अमर्यादित पेमेण्‍ट्स थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यांमध्‍ये जमा होण्‍यास मदत करते. हे एकमेव क्‍यूआर आहे, जे व्‍यापा-यांना एकसंधीपणे पेटीएम वॉलेट, रूपे कार्डस, पेटीएम यूपीआय आणि इतर सर्व यूपीआय ॲप्‍सच्‍या माध्‍यमातून पेमेण्‍ट्स स्‍वीकारण्‍याची सुविधा देते. सर्व पेमेण्‍ट्ससाठी फक्‍त एकच क्‍यूआर कोडची सुविधा उपलब्‍ध झाल्‍यामुळे विक्रीच्‍या वेळी होणारा गोधळ दूर होतो. 

पेटीएम ऑल-इन-वन पीओएसला एमएसएमई, तसेच मोठ्या रिटेलर्समध्‍ये खूपच लोकप्रि‍यता मिळाली आहे. हे वैशिष्‍ट्य पेटीएम ऑल-इन-क्‍यूआर, पेटीएम फॉर बिझनेस अॅप, डेबिट व क्रेडिट कार्ड स्‍वाइपिंग सुविधा, टचस्क्रिन, प्रिंटर, सिम कार्ड व इतर वैशिष्‍ट्यांसह सुसज्ज आहे. व्‍यापारी जीएसटी-प्रमाणित बिले देखील बनवू शकतात आणि त्‍यांचे दैनंदिन व्‍यवहार, तसेच इन-स्‍टोअर यादीचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. 

पेटीएम प्रवक्‍त म्‍हणाले, ''व्‍यापारी देशाचे आधारस्‍तंभ आहेत आणि आम्‍ही त्‍यांना सर्वोत्तम पेमेण्‍ट्स व डिजिटल सेवा तंत्रज्ञानासह सक्षम करण्‍याच्‍या मिशनवर आहोत. आम्‍ही देशाच्‍या कानाकोप-यापर्यंत आमच्‍या सेवा विस्‍तारित करण्‍याचे प्रयत्‍न सुरूच ठेवत लहान नगरे व गावांना १०० टक्‍के डिजिटली सक्षम करत आहोत.''  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight