ती परत आलीये... पहा तिचा चेहरा

झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीये' या आगामी मालिकेची चर्चा सर्वत्र चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असलेला हा प्रोमो पाहून अनेकांची झोप उडाली.
झी मराठीवर रात्री हा प्रोमो प्रसारित झाला आणि या प्रोमो नंतर एकच खळबळ उडाली ती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे कि मुखवटा? ती परत आलीये असं विजय कदम आधीच्या प्रोमो मध्ये म्हणतात आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. ती कोण आहे याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, "तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे हे मला माहिती पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल."
विजय कदम व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. आता १६ ऑगस्ट रोजीच ती आणि तिची कहाणी प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल.
तेव्हा पाहायला विसरू नका ती परत आलीये १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ