बेटरप्लेस ॲप

बेटरप्लेसकडून भारतातील कामगार वर्गाच्या मनुष्यबळाच्या सक्षमीकरणासाठी मोबाइल ॲपचे अनावरण

कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांना आकर्षक रोजगाराच्या संधी मिळवून आपले राहणीमान सुधारण्यासाठी वचनबद्ध असलेला एक उपक्रम

१२०० पेक्षा अधिक कंपन्यांकडून उपलब्ध देशभरातील १० लाख निश्चित रोजगाराच्या संधींचा समावेश

भारत  ऑगस्ट २०२१: भारतातील सर्वांत मोठ्या टेक्निकल कंपन्यांपैकी एक असलेल्या बेटरप्लेसने एक खास मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणले आहे, ज्यातून देशभरातील कामगार वर्गातील रोजगार शोधणाऱ्या लोकांना नोकरी शोधण्यास मदत मिळेल आणि त्यांच्या कौशल्याच्या गरजांचीही पूर्तता होऊ शकेल. या ॲप्लिकेशनमध्ये १२०० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या १० लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी दाखवल्या जातील. सातत्याने कामगार वर्गातील मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्याचे वचन कायम राखण्याच्या हेतूने बेटरप्लेसकडून भारतभरात नोकरी शोधणाऱ्या लाखो लोकांसाठी संधी दिल्या जात आहेत आणि कोणत्याही ठिकाणाहून अर्ज करता येणार आहे.

भारताच्या वैविध्यपूर्णतेला पूरक ठरणारे हे अॅप ६ भाषांमध्ये बहुभाषिक वापरकर्ता इंटरफेससोबत तयार केलेले आहे इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तामिळ, हिंग्लिश (दोन्ही भाषांच्या स्वीकारासाठी हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण). इच्छुक उमेदवारांना या अॅपवर आपला सीव्ही मोफत बनवता येईल आणि आपले मित्र किंवा सहकाऱ्यांना संदर्भासाठी पाठवता येईल. विविध प्रकारच्या १००० कार्यांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. जसे डिलिव्हरी पार्टनर, रायडर पार्टनर, ड्रायव्हर पार्टनर, फील्ड असोसिएट्स, रिटेल असोसिएट्स, टेलिकॉलर्स, इलेक्ट्रिशियन इत्यादी आणि उमेदवारांना मासिक ३०,००० रूपयांपर्यंत वेतन मिळवता येईल. वापरकर्त्याला देशातील कोणत्याही भागातून लॉगिन करून आपले प्रोफाइल तयार करता येईल आणि आपल्या इच्छुक नोकरी/ संधीसाठी अर्ज करता येईल.

बेटरप्लेस ॲप हे अत्यंत कार्यक्षम आणि अडथळामुक्त आहे. त्याचे उद्दिष्ट एक चांगला वापरकर्ता अनुभव देण्याचे आहे. उमेदवारांना आपला संपूर्ण प्रवास पाहता येईल - एक चांगली नोकरी शोधण्यापासून ते रूजू होईपर्यंत, हे सर्व फक्त ॲपवरच करता येईल. या प्लॅटफॉर्ममुळे व्यवसायांना दूरध्वनीद्वारे मुलाखतीच्या घेण्यास आणि जवळच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी सुविधा देणेही शक्य होईल. हा ॲप गुगल प्लेस्टोअरवर (Google Playstore) उपलब्ध असून त्यात अनुभव सोपा करण्यासाठी इन-ॲप प्रवासासाठी आवाजाद्वारे नेव्हिगेशनही शक्य होईल.

बेटरप्लेसचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी सौरभ टंडन म्हणाले की, बेटरप्लेस हे भारतातील कामगार वर्गातील कर्मचारी वर्गाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. आमच्या ब्रँडच्या सर्वोत्तमतेवर काम करताना आम्हाला कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि उत्तम असलेले एक व्यासपीठ तयार करायचे होते. ही जागतिक साथ जगभरातील प्रत्येक व्यक्तीसाठी चढउताराची ठरली आहे आणि आपणा सर्वांना मदत व सहकार्याचे महत्त्व पटले आहे. कोविड-१९ मुळे कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेटरप्लेसमध्ये हे सर्व कंपन्या आणि कामगार वर्गांना जोडून आणि नोकरीच्या संधी तसेच अर्थव्यवस्थेचा विस्तार करून शक्य केले गेले आहे.”

ते पुढे म्हणाले की, आम्हाला ब्लू कॉलर नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ तयार करायचे होते, ज्याद्वारे त्यांना नोकरीच्या संधी शोधता येतील. मोबाइल ॲपमध्ये १० लाखांपेक्षा जास्त पडताळणी केलेल्या नोकरीच्या संधी आहेत - त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांना निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र या बदलत्या काळात, आम्हाला हे कळते की आपल्याला फक्त रोजगार देण्यापुरतेच काम करायचे नाही. त्यामुळे या सेवा कौशल्यविस्तारासारख्या क्षेत्रांसाठीही महत्त्वाच्या ठरतात.”

जागतिक साथीची सुरूवात झाल्यापासून देश आणि येथील लोकांना नोकरीच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील सर्वाधिक धक्का बसलेले लोक म्हणजे सर्व निळ्या कॉलरचे कर्मचारी आहेत, जे आपल्या नोकऱ्या टिकवण्यासाठी धडपडत आहेत किंवा सुरक्षित संधींच्या शोधात आहेत. ब्लू कॉलर्ड कर्मचाऱ्यांचे स्थान तपासून आणि समजून घेऊन बेटरप्लेसने नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक वातावरणनिर्मिती केली आहे. काळाची गरज ओळखून बेटरप्लेसने ब्लू कॉलर्ड कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या सुरक्षित संधी शोधण्यासाठी एक ॲप तयार केले आहे.

गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध - https://play.google.com/store/apps/details?id=com.BetterPlace.hire

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ