मुथूट्टु मिनि फायनान्सर्स लि

मुथूट्टु मिनिचा एनसीडी पब्लिक इश्यु खुलावार्षिक परतावा 10.47% पर्यंत मिळू शकेल

*केवळ ऑप्शन VIमध्ये उपलब्ध

·         प्रत्येक रु.1,000 दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड एनसीडींचा इश्यु.

·         या एनसीडी इश्युचा आधारभूत इश्यु आकार रु.125 कोटी इतका आहेज्यात एनसीडी राखून ठेवण्याचा पर्याय समाविष्ट आहेरु.125 कोटींपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन करण्याचा पर्याय खुला असून याचे एकूण मूल्य रु. 250 कोटी असेल (15 वा एनसीडी इश्यु)

·         सिक्युअर्ड एनसीडी पोर्शन रु.200 कोटीपर्यंत असेल आणि अनसिक्युअर्ड एनसीडी पोर्शन रु.50 कोटीपर्यंत असेल

·         15 व्या एनसीडी इश्युला केअर रेटिंग्ज लिमिटेडकडून 'CARE BBB+' : स्थिर (ट्रिपल बी प्लस : स्थिर) मानांकन मिळाले आहे.

·         15 व्या एनसीडी इश्युमध्ये सिक्युअर्ड एनसीडींचे रिडम्प्शन# केले असता वार्षिक मोबदला 10.22% पर्यंत मिळू शकेल आणि अनसिक्युअर्ड एनसीडींसाठी हाच मोबदला 10.41%पर्यंत असू शकेल.

·         15 वा एनसीडी इश्यु 18 ऑगस्ट, 2021 रोजी खुला झाला आणि 9 सप्टेंबर, 2021 रोजी बंद होईल (हा इश्यु लवकर बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे).

·         एनसीडी बीएसई लिमिटेडमध्ये सूचिबद्ध होण्याचे प्रस्तावित आहे.

#अधिक माहितीसाठी 13 ऑगस्ट, 2021 या तारखेच्या माहितीपत्रकाचा संदर्भ घ्या.

मुंबई/कोची20 मार्च 2021 : मुथूट्टु मिनि फायनान्सर्स लि.ची (मुथूट्टु मिनि”/‘एमएमएफएल’) स्थापना 1998 साली झाली. ही कंपनी सुवर्ण कर्ज क्षेत्रामध्ये डिपॉझिट न घेणारी सिस्टेमिकली इम्पॉर्टंट एनबीएफसी (असेट आकार रु.500 कोटी किंवा त्याहून अधिक असलेल्या कंपन्या) आहे. या कंपनीतर्फे त्यांचे सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड डिबेंचर्स (एनसीडी”) खुले करण्याची घोषणा केली. प्रत्येक डिबेंचरचे दर्शनी मूल्य रु. 1,000 असेल.

15व्या एनसीडी इश्युचे एकूण मूल्य रु. 125 कोटी इतके आहे. यात रु.125 कोटींपर्यंतचे ओव्हर-सबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसे झाल्यास त्याचे एकूण मूल्य रु.250 कोटी असेल. या एनसीडी इश्युमध्ये एनसीडींच्या सबस्क्रिप्शनसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात कूपनचे दर वार्षिक 8.75% - 10.00% आहेत. एनसीडी इश्यु 18 ऑगस्ट, 2021 रोजी खुला झाला आणि 9 सप्टेंबर, 2021 रोजी बंद होईल. हा कालावधी लवकर बंद होण्याचा किंवा याचे विस्तारीकरण होण्याचा पर्याय आहे.

31* मार्च 2021 रोजी एमएमएफएलकडे 3,86,110 सुवर्ण कर्ज खाती होती. यापैकी बुहतांश खाती ग्रामीण आणि निमशहरी भागांतून होती. त्यांचे एकूण मूल्य 1,935.10 कोटी होते. त्यांच्यातर्फे देण्यात आलेल्या एकूण कर्जापैकी आणि अॅडव्हान्सेसपैकी हा वाटा एकूण 97.04% आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांतील परतावा जो आर्थिक वर्ष 2019मध्ये 19.17% होता तो वाढून आर्थिक वर्ष 2021 मध्ये 19.57% झाला. आर्थिक वर्ष 2021साठी त्यांचे निव्वळ नॉन-परफॉर्मिंग असेट्स 0.75% होतेजे आर्थिक वर्ष 2019मध्ये 1.39% होते.

सोन्यावरील कर्जाच्या व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्यातर्फे मायक्रो-फायनान्स लोनडिपॉझिटरी पार्टिसिपंडमनी ट्रान्सफरइन्श्युरन्स ब्रोकिंगपॅन कार्डशी संबंधित आणि ट्रॅव्हल एजन्सी सेवा प्रदान करण्यात येतात.

निनन मथाई मुथुट्टू यांनी 1887 साली या कौटुंबिक व्यवसायाची स्थापना केली. आता या कंपनीचे नेतृत्व अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालक निझी मॅथ्यू आणि व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मुथुट्टू यांच्या हाती आहे.

या इश्युअंतर्गत असलेल्या एनसीडीच्या प्रत्येक पर्यायाच्या अटी खाली नमूद केल्या आहेत:

या इश्युमधून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग ऑनलवर्ड लेंडिंगफायनान्सिंग आणि कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलीची व व्याजाची परतफेड/प्रिपेमेंट (किमान 75%) आणि उरलेल्या निधीचा वापर (25%पर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येईल.

13 ऑगस्ट 2021 या तारखेच्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड एनसीडी बीएसईमध्ये सूचिबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

विवरो फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी लीड मॅनेजर्स आहेत.

मिटकॉन ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड हे डिबेंचर ट्रस्टी आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ