ती परत आलीये मधील कलाकारांची फौज आहे प्रेक्षकांच्या ओळखीची

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ती परत आलीये हि मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय. हि मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती कि या मालिकेत कोणते कलाकार असणार आहेत. प्रोमोज मध्ये फक्त अभिनेते विजय कदम प्रेक्षकांच्या भेटीस आले पण बाकी कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच होती. मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्यातील कलाकार देखील प्रेक्षकांच्या समोर आले आणि हे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचेच आहेत.
‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मालिका विश्वात काम केलेल्या काही कलाकारांना संधी दिली आहे. विजय कदम हे सर्वांच्याच ओळखीचे अभिनेते आहेत. मध्यवर्ती भूमिकेत त्यांचा चेहरा समोर ठेवून इतर कॅरेक्टर्स अत्यंत चांगल्या प्रकारे कथानकात गुंफल्या आहेत. यातील सर्वच व्यक्तिरेखांना समान महत्त्व आहे. यासाठी कॅरेक्टरला न्याय देऊ शकेल अशा कलाकारांची निवड केली.
या मालिकेतील तरुण मुलांमध्ये सायली नावाचं कॅरेक्टर कुंजिका काळवींट साकारत आहे. हिने याआधी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. नचिकेत देवस्थळीनं विक्रांत साकारत आहे. यानं ‘सुखन’, ‘महानिर्वाण’ या नाटकांसोबतच ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये काम केलं आहे. श्रेयस राजे याने देखील या आधी २ मालिकांमध्ये काम केलं आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका काहे दिया परदेस या मालिकेतील समीर खांडेकर या मालिकेत हणम्याची भूमिका साकारतोय. टीकारामची भूमिका प्रथमेश विवलकर करतोय तसेच अनुजाची भूमिका अभिनेत्री वैष्णवी करमरकर हे देखील या आधी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. मँडीच्या भूमिकेतील तेजस महाजन ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मधून आला आहे. त्याची ही पहिलीच मालिका आहे. या सर्वांची निवड ऑडिशनद्वारे करण्यात आली.
सध्या या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि अभयचा खून झाला असून तो खून कोणी केला हे अद्याप कळलं नाही आहे. अभयच्या खुनामागे कोण आहे हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ती परत आलीये सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार