एमटीएआर टेक्नोलॉजिज लि

एमटीएआर टेक्नोलॉजिज लिमिटेड

एमटीएआर टेक्नोलॉजिजच्या आर्थिक वर्ष 2022च्या पहिल्या तिमाहीच्या एकत्रित करोत्तर नफ्यात गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेने 63.6% वाढ

हैदराबाद, 9 ऑगस्ट 2021 : एमटीएआर टेक्नोलॉजिज (एमटीएआर) ही हैदराबाद येथील आघाडीची प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनी असून या कंपनीतर्फे क्लोज टॉलरन्स असलेल्या मिशन क्रिटिकल कंपोनंट्सची निर्मिती व विकास आणि महत्त्वाच्या असेंब्ली करण्यात येतात. ही कंपनी अणु, अवकाश, संरक्षण व क्लीन एनर्जी क्षेत्रांना सेवा प्रदान करते. 30 जून 2021 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे निकाल या कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले.

ऑपरेशनल ठळक मुद्दे

कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनही जून 2021पर्यत हॉट बॉक्सेसचे दरमहा सर्वाधिक उत्पादन नोंदविले

आर्थिक वर्ष 2021च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेने कस्टमरशी असलेल्या कॉन्ट्रॅक्ट्समधून (विक्री) मिळालेल्या उत्पन्नात 10.9% वाढ

कोव्हिड-19च्या दुसऱ्या लाटेचा परिणाम असूनही आर्थिक वर्ष 2021च्या पहिल्या तिमाहीच्या तलुनेने निर्यातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात 52% वाढ झाली

या निकालावर प्रतिक्रिया देताना एमटीएआर टेक्नोलॉजिजचे व्यवस्थापकीय संचालक आणि पर्वत श्री. पर्वत श्रीनिवास रेड्डी म्हणाले, 

"आर्थिक वर्ष 2022 ची पहिली तिमाही आव्हानात्मक होती कारण देशालाच विनाशकारी दुसऱ्या लाटेचा फटका बसला. त्यामुळे मूल्यसाखळीमध्ये पुरवठा साखळीमध्ये खूप अडथळे आले. कामगारांची कमतरता, अधूनमधून होणारे लॉकडाऊन आणि परीक्षणातील विलंब यामुळे विशेषतः उत्पादन क्षेत्रावर हा परिणाम जास्त झाला. ही आव्हाने असूनही एमटीएआरने रु.54.0 कोटींचे उत्पन्न मिळविले आणि गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षीची वाढ 10.9% इतकी नोंदविली. आम्ही रु.14.5 कोटी इतका ईबीआयटीडीए नोंदविला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलेने ही 26.6% इतकी वाढ आहे आणि निव्वळ नफा रु.8.7 कोटी असून गेल्या वर्षीच्या तुलेने या वर्षी 63.6% वाढ झाली आहे. 

महामारी कमी होत असल्यामुळे आर्थिक वर्ष 2022च्या आगामी तिमाहीमध्ये आम्ही अधिक चांगली प्रगती करू, अशी अपेक्षा आहे. सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर, क्लीन एनर्जी, अवकाश आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रचंड राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेत असणाऱ्या संधींमुळे मिळणाऱ्या ऑर्डर्समध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

एमटीएआर टेक्नोलॉजिज लि. (www.mtar.in) BSE: 543270; NSE: MTARTECH)

एमटीएआरचे एकूण सात उत्पादन कारखाने आहेत, ज्यात अत्याधुनिक सुविधा असलेल्या निर्यातभिमुख कारखान्याचा समावेश आहे. हे कारखाने हैदराबाद आणि तेलंगणामध्ये आहेत. नागरी अणु ऊर्जा, अवकाश व संरक्षण, क्लीन एनर्जी या क्षेत्रांना एमटीएआर सेवा प्रदान करते. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यासारख्या आघाडीच्या संस्थांशी या कंपनीचे चार दशकांहून अधिक काळ संबंध आहेत आणि त्यांना मिशनसाठी महत्त्वाची असणारी उत्पादने पुरवली आहेत. एमटीएआरच्या क्लाएंट्समध्ये ब्लूम एनर्जी, राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स, एलबिट सिस्टिम्स इत्यादी जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित ओईएमचा समावेश आहे. न्यूक्लिअर आयलंडच्या मुख्य भागाची असेंब्ली, लिक्विट प्रोपल्शन इंजिन्स, क्रायोजेनिक अपर स्टेज (टर्बो पंप्स, बूस्टर पंप्स, गॅस जनरेटर्स आणि इंजेक्टर हेड्स), उपग्रहांसाठी इलेक्ट्रोन्यूमॅटिक मोड्यूल्स यासह  स्पेस लाँच अवकाशयानांची असेंब्ली, आघाडीच्या भारतीय व जागतिक पातळीवरील संरक्षण संस्थांसाठी सुटे भाग व असेंब्ली, सॉलिड ऑक्साइड फ्युएल सेल युनिट्स, हायड्रोजन युनिट्स आणि इलेक्ट्रोलायझर्ससह फ्युएल सेल्ससाठी उपकरणे यांचा कंपनीच्या प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार