हार्दिक जोशी वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला रांगडा मर्द हार्दिक जोशी म्हणजेच झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतील राणादा आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे. अभिनेता हार्दीक जोशी याच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि राणामुळे हार्दिकला ओळख मिळाली. मालिका संपल्यावर या राणाला प्रेक्षक खूप मिस करत आहेत. पण आता हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी एका वेगळ्या व्यक्तिरेखेसोबत पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. हो हे खरं आहे. हार्दिक एका नवीन भूमिकेसोबत पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय.
झी मराठी वाहिनीवरील “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि या प्रोमोमध्ये अभिनेत्री ‘अमृता पवार’ हिला प्रेक्षकांनी पाहिलं. या मालिकेतील नायक कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. या मालिकेतील नायक दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता ‘हार्दिक जोशी’असणार आहे. नुकतंच या मालिकेचा दुसरा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षकांचा लाडका अभिनेता हार्दिक जोशी या प्रोमो मधून प्रेक्षकांसमोर सज्ज झाला. ही मालिका ३० ऑगस्ट पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ