गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या ‘देश की तिजोरी’ अभियानाचे त्यांचा ब्रॅंड ॲम्बेस्डर आयुष्यमान खुराना याच्या हस्ते उद्घाटन
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या ‘देश की तिजोरी’ अभियानाचे त्यांचा ब्रॅंड ॲम्बेस्डर आयुष्यमान खुराना याच्या हस्ते उद्घाटन
• १९०२ सालापासून गोदरेज बनवत असलेल्या त्यांच्या प्रसिद्ध तिजोरी किंवा लॉकर्सवर हे नवीन अभियान प्रकाश टाकेल
•या अभियानाचा एक भाग म्हणून, एका स्मार्ट होमसह होम लॉकरसारखी बनवलेली एक व्हॅन संपूर्ण भारतातील १०० शहरांमध्ये १०० दिवस फिरणार आहे.
मुंबई, ४ ऑक्टोबर, २०२३: ‘भारताची तिजोरी’ म्हणून ओळखले जाणाऱ्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या ‘देश की तिजोरी’ अभियानाचे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या हस्ते आज अनावरण झाले. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉइसचे व्यापार युनिट असलेले गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स त्यांच्या सिक्युर ४.० (Secure 4.0) व्यासपीठाद्वारे कल्पकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांवर लक्ष केंद्रित करत आहे.
गोदरेजने १९०२ सालामध्ये बनविलेल्या पहिल्या भारतीय लॉकरपासून (मेड इन इंडिया) ते आजच्या अगदी नवीनतम डिजिटल लॉकर्सपर्यंत गोदरेजच्या उत्पादनांनी भारतात घरोघरी आपले एक वेगळे स्थान कसे निर्माण केले हे ‘देश की तिजोरी’ अभियान लोकांपर्यंत पोहोचवते. गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पुष्कर गोखले यांनी सांगितले की, आजच्या बदलत्या पद्धतीमध्ये घरमालक घराची सजावट आणि सौंदर्यशास्त्र यालाच केंद्रस्थानी ठेऊन त्यास जास्त महत्त्व देतात. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडायच्याआधी घराच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे महत्व ग्राहकांना सांगणे व त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे अत्यावश्यक आहे. शिवाय, सध्या स्मार्ट होम उपकरणांकडे ग्राहकांचा कल असल्याने होम सेक्युरिटी ब्रॅंड देखील स्मार्ट होम तंत्रज्ञानपूरक असणे गरजेचे आहे; कारण आज ग्राहक तंत्रज्ञानाधिष्ठित उपाय निवडत आहेत.
(Godrej Security Solutions (GSS) Secure 4.0 Van ‘Desh ki Tijori’ Launched)
व्हॅनच्या आत तयार केलेले स्मार्ट होम व्हिडीओ डोअर फोनपासून ते होम सेक्युरिटी लॉकरपर्यंत, होम सेक्युरिटी कॅमेऱ्यांपासून ते सीसिटीव्ही कॅमेऱ्यांपर्यंत विविध स्मार्ट होम सुरक्षा उत्पादनांची एक सर्वसमावेशक श्रेणींचे प्रदर्शन करते. व्हॅनच्या आत तयार केलेले हे स्मार्ट होम एका अशा अतिशय कार्यक्षम उपक्रमाचे प्रतिनिधीत्व करते ज्या उपक्रमाचा उद्देश घर मालकांना स्मार्ट होम सुरक्षा उपाय वापरण्यासाठी प्रेरणा देणे आणि त्यासंबंधी मार्गदर्शन करणे हा आहे.
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “एक ब्रॅंड म्हणून ज्याने केवळ भारतातील घरेच नाही तर बँकिंग क्षेत्र, ज्वेलरी क्षेत्र किंवा अभ्यागत व आदरातिथ्य (हॉस्पिटलिटी) अशा अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांच्या सुरक्षिततेसाठी अव्याहतपणे काम केले आहे त्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या सिक्युर ४.० (Secure 4.0) च्या अंतर्गत आम्ही ज्या नवकल्पना ग्राहकांसाठी आणत असतो त्यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मला अतिशय आनंद होत आहे.
लोकांनी अनेक दशकांपासून ज्या उत्पादनांवर विश्वास ठेवला आहे व जी उत्पादने कालानुरूप धोके आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन सातत्याने विकसित होत आहेत अशा उत्पादनांना लोकांसमोर मांडणे हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित ब्रॅंड्सपैकी एक असलेल्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचा ‘देश की तिजोरी’ हा उपक्रम चालू करण्यामागील विचार आहे.
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पुष्कर गोखले पुढे म्हणाले, “या उपक्रमाचा एक भाग म्हणून, गृह सुरक्षेसंबंधीची आमची नवीनतम कल्पक उत्पादने लोकांसमोर मांडण्यासाठी आम्ही खास ‘चार (4) व्हॅन्स (“four (4) Vans”) तयार केली आहेत. या व्हॅन्स मुंबईपासून चालू करून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण असा चारी दिशांना प्रवास करतील. या व्हॅन्सच्या द्वारे १०० दिवसांपेक्षा कमी कालावधीमध्ये भारतातील १०० शहरांमध्ये होम सेक्युरिटीविषयक जागरूकता पसरविणे आणि ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करणे हे आमचे लक्ष्य आहे. मला अतिशय आनंद होत आहे की, आमचा ब्रॅंड अॅम्बेस्डर आयुष्यमान खुराना आज आमच्या सोबत आहे. मनःशांती मिळविण्यासाठी गृह सुरक्षेमध्ये गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे या बाबतच्या आमच्या विचारांना आयुष्यमान खुराना भारतीय घरांमध्ये पोहोचवतो.”
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचा ब्रॅंड ॲम्बेस्डर आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराना यावेळी म्हणाला, “सतत प्रवास करणाऱ्या आणि अधिकाधिक वेळ घराबाहेर असणाऱ्या मला आपल्या घराच्या व त्याच्या आसपासच्या सुरक्षिततेचे महत्त्व पूर्णपणे समजते. कित्येक भारतीयांप्रमाणे मी देखील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गोदरेज सोबत मोठा झालो आहे आणि त्यामुळेच गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सबरोबर जोडले जाणे हा माझ्यासाठी खरोखरच एक सन्मान आहे. मला अजूनही माझ्या घरात असलेली एक जुनी ‘तिजोरी’ आठवते जी घरातील मौल्यवान वस्तु नीट सुरक्षित ठेवण्यासाठीचे प्रतीक मानली जात असे. आज जेव्हा मला तंत्रज्ञानाधिष्ठित आणि डिजिटलीपूरक अशी उत्पादने जास्त हवी आहेत तेव्हा देखील मी माझ्या ‘मनःशांती’साठी (peace of mind) गोदरेज ‘तिजोरी’वर विश्वास ठेवू शकतो याचा मला आनंद वाटतो. केवळ फरक एवढाच की आता माझ्याकडे अतिशय मस्त असे बायोमॅट्रिक स्कॅनर असलेले गोदरेज डिजिटल लॉकर आहे. आजचे हे अभियान अगदी हेच दाखवते की, तिजोरी किंवा गोदरेज होम लॉकर निरंतर काळानुरूप विकसित होत आहे. गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स केवळ भारतीय घरांसाठीच नाही तर भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी सातत्याने कसे नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करत आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. कारण ग्राहक म्हणून आपण या सर्व क्षेत्रांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जोडलेले असतो. आपली हीच इच्छा असते की आपले घरातील लॉकर असो वा बँकेतील लॉकर असो ते सर्वोत्कृष्ट पद्धतीने सुरक्षित असावे.”
कल्पकता, नावीन्य आणि सुरक्षितता यांच्या वचनबद्धतेसह गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायांच्या व लोकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणून या उद्योग क्षेत्रातील मानके नव्याने ठरवित राहील. सिक्युर ४.० (Secure 4.0) अभियान हे लोकांना बदलत्या धोक्यांबद्दल माहीत करून देणे आणि वापरकर्त्यांना नवीन व अधिक उत्तम सुरक्षा उपाय घेण्यासंबंधी जागृत करणे यासाठी गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स करत असलेल्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग आहे.
या नवीन उत्पादनाची वैशिष्ठ्ये:
‘की लॉक’ आणि ‘डिजिटल लॉक’ अश्या दोन भिन्न प्रकारांमध्ये येणारे हे नवीन ‘मॅट्रिक्स लॉकर’ कारागिरी आणि तंत्रज्ञान या दोन्हीच्या सर्वोत्तम बिंदूचे प्रतिनिधीत्व करते. ‘की लॉक’ प्रकार प्रथमच लक्षणीय रीतीने सुरक्षा वाढविणारी अभूतपूर्व अशी डयूएल कंट्रोल लॉक यंत्रणा आणत आहे. दुसरीकडे, ‘डिजिटल लॉक’ प्रकार मास्टर कोड, यूजर कोड आणि एक आवश्यक अशी ओव्हर राइड की यांसह सुरक्षेच्या विविध पर्यायांची एक श्रेणीच प्रदान करते. ही दोन स्तरीय सुरक्षा निश्चित करते की, केवळ अधिकृत व्यक्तीच मॅट्रिक्स लॉकरच्या अतिशय बारकाईने डिझाईन केलेल्या आतील भागात प्रवेश मिळवू शकतील. आतमध्ये तुमच्या गरजा पूर्ण करेल अशी अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली रचना आहे. यामध्ये ॲडजस्ट करता येण्याजोगे कठिण अश्या काचेचे कोनाडे आणि इंटेलिजन्ट प्रकाश योजना आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचे सामान व्यवस्थित जमवून ठेवणे आणि ते सहजतेने हवे तेव्हा मिळवणे सोपे होते. मॅट्रिक्स लॉकर तर सुरक्षेच्या बाबतीत एक पाऊल आणखी पुढे जाते. बाहेरील धोक्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी यामध्ये आर्मर प्लेट (चिलखत) सह दुहेरी भिंतीचे संरक्षण (डबल वॉल प्रोटेक्शन) समाविष्ट आहे. याशिवाय, ऑटो फ्रीज वैशिष्ठ्य प्रवेश मिळविण्यासाठी वारंवार अयशस्वी प्रयत्न केला तर वापरकर्त्याचा प्रवेश नाकारतो, ज्यामुळे कोणत्याही अनधिकृत प्रवेशाला प्रभावीपणे अडविले जाऊन अधिक सुरक्षिततेची हमी मिळते. मॅट्रिक्स लॉकर इतरांपेक्षा वेगळे ठरते ते त्याच्या अनुकूलन क्षमतेमुळे (ॲडाप्टॅबिलिटी). हे जीएसएम मॉडयूल (GMS Module), एक्सटर्नल हूटर (External hooter), आय-वॉर्न सेन्सर (I- Warn sensor) यांच्याशी हे सुसंगत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या विशिष्ट आवश्यकतांनुसार सानुकूल करता येईल अशी सर्वसमावेशक सुरक्षा प्रणाली तयार करता येते. ही अनोखी अनुकूलन क्षमता खऱ्या अर्थाने मॅट्रिक्स लॉकरला सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांचे एक मूर्त प्रतीक बनवते.
विशेषतः, आय-वॉर्न सेन्सर (I- Warn sensor) कोणत्याही प्रकारचा अनधिकृत प्रवेश झाला तर किंवा लॉकरसोबत काही छेडछाड झाली तर ताबडतोब घरमालकांना सूचित करून तुमच्या लॉकरच्या सुरक्षिततेला एक अतिरिक्त स्तरच जोडतो. नवीन मॅट्रिक्स लॉकर हे फक्त सुरक्षित नाही तर तुमच्या अतिशय मौल्यवान वस्तूंसाठी जणू सुरक्षिततेचा किल्ला किंवा तटबंदीच आहे.
स्मार्ट फॉग ही भारतीय बाजारपेठेत अशा प्रकारची सादर होणारी पहिली आणि अनोखी संकल्पना असून ती घुसखोरांना प्रभावीपणे थांबवते. सुरक्षेच्या क्षेत्रात क्रांति घडवून आणणारे हे उत्पादन ज्वेलर्सच्या एकूण सुरक्षा परिसंस्थेला संरक्षणाचे एक अतिरिक्त स्टर जोडते. कोणतीही तिजोरी किंवा कप्पा उघडण्याचे झालेले अनधिकृत प्रयत्न शोधण्यासाठी ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. ही प्रणाली ट्रीगर करण्यासाठी यामध्ये क्लाउडवर आधारित, दूरस्थपणे काम करू शकेल असे ॲप्लिकेशन आणि वायरलेस तंत्रज्ञान आहे. ट्रिगर होताच स्मार्ट फॉग कॉन्सन्ट्रेटेड लिक्विफाइड ग्लायकॉलपासून बनलेले दाट धुके उत्सर्जित करते. हे धुके माणसासाठी मुळीच अपायकारक नाही, मात्र अचानक उत्सर्जित झालेल्या दाट धुक्यामुळे एक भीती निर्माण होते आणि गुन्हेगाराला धुक्यामुळे समोरील काहीही दिसेनासे होते व तो एका जागीच थबकतो आणि तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना योग्य ती उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
गोदरेज स्विंग लेन बॅरीअर समाविष्ट असलेली फेशियल रेकग्निशन सिस्टम (चेहरा ओळखण्याची प्रणाली) मोठ्या प्रमाणात थ्रूपुट राखत सुरक्षाही वाढवते आणि कर्मचाऱ्यांना इमारतीमध्ये प्रवेश करण्याची प्रकिया सहज सोपी देखील करते. फेस रेकग्निशन रीडर ४ मीटर अंतरापर्यंत डेटाबेसमध्ये साठवून ठेवलेल्या टेंप्लेट्सनुसार व्यक्तींना प्रमाणित करते, ज्यामुळे हे “वॉक थ्रू रीडर” बनते. हे लॅन (LAN) ला जोडता येते आणि यास दूरस्थपणे लांबून देखील अॅडमिनिसट्रेशन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्यवस्थापित करता येते. फेशियल रेकग्निशन सिस्टमचे काही मुख्य फायदे म्हणजे लाइव्ह आणि फेक फेस डेटेक्शन, मास्क घातलेले असताना किंवा नसताना दोन्हीमध्ये हे प्रमाणीकरण करू शकते आणि वापरकर्ते गेटमधून येत असताना एका पेक्षा जास्त चेहऱ्यांच्या ओळखीचे प्रमाणीकरण (मल्टीफेस ऑथेंटिफिकेशन).
अधिकृत प्रवेशाची अचूकता अजून जास्त सुधारण्यासाठी फेस रेकग्निशन सिस्टम स्विंग लेन बॅरिअरमध्ये जोडले जाऊ शकते. गोदरेज स्विंग लेन बॅरिअर हे एक कल्पक व नवीन प्रकारचे पायी चालणाऱ्यांवर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठीचे तंत्रज्ञान (पेडेस्ट्रीअन कंट्रोल टेक्नॉलॉजी) असून ते गुणवत्ता, कामगिरी आणि किफायतशीरपणा यासर्वांमध्ये उत्तम संतुलन साधण्यासाठी खास तयार केले आहे. गोदरेज स्विंग लेन बॅरिअर (जीएसएलबी) मालिका अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी एक विश्वासार्ह असे यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक यांचे उत्तम संयोजन प्रदान करते. प्रतिबंध करीत असतानदेखील ते एक स्वागतार्ह वातावरण देखील राखते. याचे स्टँडर्ड कॅबिनेट क्लॅडींग स्टेनलेस ३०४ फिनिश मध्ये येते. शिवाय गोल्ड (GOLD) किंवा लॉबीच्या सौंदर्याच्या दृष्टीने सुयोग्य असणाऱ्या अन्य कोणत्याही रंगाचे पर्याय देखील उपलब्ध आहे.

Comments
Post a Comment