गो एअरलाइन्स (इंडिया) चालवत असलेला एलसीसींचा ताफा जगातील सर्वांत नवीन ताफ्यांपैकी एक
गो एअरलाइन्स (इंडिया) लिमिटेडकडील सरासरी ३.७ वर्षे वय असलेला एलसीसींचा (लो कॉस्ट कॅरिअर्स) ताफा भारतातील सर्वांत नवीन ताफा तर आहेच, शिवाय जगातील आघाडीच्या एलसीसींच्या तुलनेत या ताफ्यातील विमाने बरीच नवीन आहेत.
गो एअरलाइन्स या अल्ट्रा लो कॉस्ट कॅरिअरच्या (यूएलसीसी) ताफ्यात अन्य भारतीय विमानकंपन्यांच्या तुलनेत अत्याधुनिक विमाने सर्वाधिक प्रमाणात आहेत. (स्रोत: सीएपीए रिपोर्ट) ए३२० एनईओ ही ए३२० सीईओंच्या तुलनेत १७-२० टक्के अधिक इंधनकार्यक्षम आहेत आणि कंपनीच्या ताफ्यात यांचे प्रमाण ८२ टक्के आहे (१० फेब्रुवारी २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार). आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरीपर्यंत या ताफ्यात केवळ ए३२० एनईओ विमानेच असतील.
गो एअरलाइन्सने आपल्या वाढीच्या योजनेचा भाग म्हणून १४४ एअरबस ए३२० एनईओ विमानांच्या डिलिव्हरीसाठी फर्म ऑर्डर्स दिल्या आहेत. कंपनीने ४६ एअरबस ए३२० एनईओ विमानांची डिलिव्हरी घेतली, तर ९८ एअरबस ए३२० एनईओ विमानांच्या डिलिव्हरीची प्रतीक्षा आहे. कंपनीने अलीकडेच एअरलाइनचे रिब्रॅण्डिंग करून तिचे नाव “गो फर्स्ट” केले. चैनीसाठी प्रवास करणारे तरुण भारतीय तसेच एमएसएमई प्रवाशांच्या ग्राहकवर्गाला लक्ष्य करून हा बदल करण्यात आला आहे.
आपली विस्तारत जाणारी नेटवर्क घनता लक्षात घेऊन, गो एअरलाइन्स इंडियाला आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १४ विमानांची डिलिव्हरी अपेक्षित आहे, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १४ विमानांची डिलिव्हरी अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये आणखी ६४ एनईओ विमाने आहेत आणि त्यांची डिलिव्हरी आर्थिक वर्ष २०२५ पासून पुढे अपेक्षित आहे.
गो एअरलाइन्सने स्लॉटची मर्यादा असलेल्या नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे अशा विमानतळांवरील आपले स्थान भक्कम केले आहे. ३१ जानेवारी, २०२० रोजी उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचे कार्यक्षेत्र २८ देशांतर्गत व नऊ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आहे.
१० फेब्रुवारी २०२१ रोजी उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या ताफ्यात ५६ विमाने आहेत, त्यापैकी ४६ ए३२० एनईओ मॉडेल्स आहेत, तर १० ए३२० सीईओ मॉडेल्स आहेत. कंपनी एकाच श्रेणीची सेवा देते. यामध्ये एथ्रीटूझिरो विमानांची आसनक्षमता कमाल राखण्याची मुभा मिळते.
एक अल्ट्रा लो कॉस्ट कॅरिअर (यूएलसीसी) म्हणून, गो एअरलाइन्सने कमी खर्चाचा मुलभूत आराखडा आणि आपल्या आधुनिक व इंधनकार्यक्षम ताफ्याचा पुरेपूर उपयोग यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतातील सर्वाधिक नेक्स्ट जनरेशन विमानांचे सर्वाधिक प्रमाण असलेला ताफा कंपनीकडे आहे. (स्रोत: सीएपीए रिपोर्ट).
गो एअरलाइन्सचा प्रयत्न आपल्या नेटवर्कची व्याप्ती निवडक उच्चउत्पन्न बाजारपेठांमध्ये विस्तारण्याचा आहे. यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मध्यपूर्व, आग्नेय आशियाचा समावेश होतो. त्याचप्रमाणे श्रीनगर, रांची आणि गोवा यांसारख्या भारतातील उच्च मागणीच्या बाजारपेठांमध्येही विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. भारतातील अतिरिक्त ठिकाणांवर विस्तार करतानाच, मार्गांची घनता अधिक वाढवण्यासाठी महत्त्वाच्या मर्यादित स्लॉट विमानतळांवरील आपल्या आघाडीच्या स्थानाचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे.
सीएपीएनुसार, आर्थिक वर्ष २०१० आणि आर्थिक वर्ष २०२० या काळात, भारतातील देशांतर्गत विमान प्रवासी बाजारपेठ ११.९ टक्के सीएजीआरवर वाढली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची बाजारपेठ ६.८ टक्के सीएजीआरवर वाढली आहे. दरडोई आसनक्षमता कमी असणे, एकूण एअरलाइन प्रवाशांची संख्या कमी असणे, अभूतपूर्व असे एकूण ताफ्याचे आकारमान आणि दीर्घ रेल्वे प्रवासाला पर्याय पुरवण्याची क्षमता यांमुळे भारतातील १३८ हवाईवाहतूक बाजारपेठांनी २००८ च्या ७६ दशलक्ष प्रवाशांपासून २०२० मधल्या २०८ दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढ साध्य केली आहे. जगभरातील कोणत्याही हवाईवाहतूक बाजारपेठेच्या तुलनेत ही सर्वाधिक वेगवान वाढ आहे. (स्रोत: सीचे प्रमाणएपीए रिपोर्ट).
गो एअरलाइन्सच्या प्रवाशांची संख्या आर्थिक वर्ष २०१८ मध्ये १.०८ कोटी होती, त्यात २२.४ टक्के सीएजीआरवर वाढ होऊन आर्थिक वर्ष २०२० मध्ये ती १.६२ कोटींवर पोहोचली. देशांतर्गत प्रवाशांच्या प्रमाणातील कंपनीचा बाजारपेठेतील वाटा आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ८.८ टक्के होता, आर्थिक वर्ष २०२० मध्ये हे प्रमाण १०.८ टक्के झाला. शिवाय सध्याच्या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या नेटवर्कमध्ये तीन नवीन ए३२० एनईओंची भर घालून मागणीतील अपेक्षित वाढीला आधार दिला.
गो एअरलाइन्सचा ऑपरेशनल कार्यक्षमतेवर व अन्य यूएलसीसी व एलसीसींच्या तुलनेत श्रेष्ठ दर्जाचा ग्राहक अनुभव देण्यासाठी आवश्यक खात्रीशीरतेवर भर आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीने विमानांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला, सरासरी उपयोग १२.९ तास प्रतिदिवस होता, तर भारवहन ८८.९ टक्के होते. (स्रोत: सीएपीए रिपोर्ट). या निकषांवर भर दिल्यामुळे सप्टेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या काळात सलग १५ महिने कंपनीने भारतातील विमानकंपन्यांमध्ये सर्वोत्तम वक्तशीर कामगिरी साध्य केली. त्याचप्रमाणे ३१ जानेवारी, २०२१ रोजी उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२१ मधील विमाने रद्द होणाऱ्या दर सर्वांत कमी, ०.३ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये म्हणजे ३१ जानेवारी २०२१ पर्यंतच्या काळात, ग्राहक तक्रारींचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजेच १०,००० ग्राहकांमागे ०.३ असा होता (उद्योगक्षेत्रातील सरासरी १०,००० ग्राहकांमागे १.० तक्रार अशी आहे) (स्रोत: सीएपीए रिपोर्ट).
Comments
Post a Comment