कॅनरा बँके तर्फे सायबर सुरक्षे विषयी जागरूकता ‍निर्माण करण्यासाठी गाण्याची सुरूवात

बंगलोर,  6 जुलै २०२१-   कॅनरा बँके  तर्फे ३ जुलै २०२१ रोजी सायबर सुरक्षेचा प्रसार करणार्‍या मोहिमेची सुरूवात केली.  बँके तर्फे स्वयंपूर्ण अशी ही मोहिम असून विविध प्रकारच्या ऑनलाईन फसवणूकीची माहिती देण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.  हा व्हिडिओ ऑनलाईन फसवणूकींवर प्रकाश टाकत आहे.  हा व्हिडिओ कॅनरा बँकेकडून देशाल समर्पित करण्यातआला आहे.  या व्हिडिओ मध्ये कॅनरा बँकेचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

 

येत्या काही दिवसात भारतातील अन्य भाषांमध्येही  हा व्हिडिओ जारी करण्यात येणार आहे. आपल्या अकाऊंटची माहिती जतन करणे आणि ओटीपी, सीव्हीव्ही किंवा पिन कोणालाही न सांगणे महत्त्वाचे आहे. बँकेकडून  त्यांच्या ग्राहकांकडून कधीही ही माहिती विचारली जात नाही.  म्हणूनच ग्राहकांच्या सुरक्षे साठी या वेगाने वाढणार्‍या डिजिटल युगात हे खूपच महत्त्वाचे आहे.

लोकांमध्ये प्रसार  करण्यासाठी कॅनरा बँकेकडून त्यांच्या खालील सोशल मिडिया हँडल्स वर हा व्हि डिओ प्रसारित करण्यात आला आहे.  Twitter: canarabank; Youtube: CanaraBankOffical; Facebook: canarabank; Instagram: canarabankinsta; Pinterest: canarabankofficial; LinkedIn: canarabank

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO