संस्कृती बालगुडे ठरली डिजीटल इन्फ्लुएन्सर

सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेली आणि करोडोंच्या हृदयात स्थान मिळवलेली बबली गर्ल अभिनेत्री संस्कृती बालगुडेला नुकतंच लोकमत डिजीटल इन्फ्लुएन्सर्स  अवॉर्डने गौरवण्यात आलंय. नुकताच लोकमतचा पहिला वहिला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स पुरस्कार सोहळा झाला. त्यामध्ये संस्कृतीला युथ आइकन- लोकमत डिजीटल इन्फ्लुएन्सर ’  ह्या सन्मानाने गौरवण्यात आलं.

पुरस्कार मिळाल्यानंतर संस्कृती म्हणाली, हा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षितच होतं. पण ह्या अवॉर्डच्या परीक्षकांना आणि लोकमत समुहाला मी ह्या पुरस्कारासठी पात्र वाटले, ह्याबद्दल मला आनंद वाटतोय.

पुरस्कारानंतर भारावून  जात ती पूढे म्हणाली, डिजीटल इन्फ्लुएन्सर म्हणवलं जाणं ही गोष्टचं मुळात माझ्यासाठीही खूप अप्रुप वाटणारी आहे. त्यात युथ आइकन डिजीटल इन्फ्लुएन्सर असा माझा पुरस्कार व्हावा , ही तर खूपच अभिमानाची बाब आहे. मी माझ्या सोशल मीडियावर खूप विचारपूर्वक पोस्ट टाकते. आणि माझ्या पोस्टसची दखल घेतली जातेय, ह्याचीच पोचपावती डिजीटल इन्फ्लुएन्सर अवॉर्डने मला मिळाली.   

संस्कृती म्हणते, मला नेहमी असं वाटतं की जर माझ्या सोशलमीडिया प्रोफाईलवर  कोणी आलं आणि पोफाईल स्क्रोल केलं. तर ते प्रभावित झाले पाहिजेत. ज्या गोष्टींमध्ये मी पारंगत आहे, म्हणजे अभिनय, नृत्य, चित्रकला ह्या गोष्टींविषयी माझ्या प्रोफाइलवर पोस्ट व्हायला पाहिजेत. आता ह्या पुरस्काराने सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना अजून जास्त जबाबदारीने वागायला हवं,ह्याची जाणीव झाली आहे.”   

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO