.२०२२च्या १ल्या तिमाहीचे निष्कर्ष - वर्षाची सर्वाधिक मजबूत सुरुवातदोन अंकी लाभदायक विक्री वृद्धी

मुंबई४ ऑगस्ट २०२१: गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएलह्या ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या उदयोन्मुख अग्रगण्य कंपनीने ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे तिचे आर्थिक निष्कर्ष आज जाहीर केले.

आर्थिक दृष्टिक्षेप

.२०२२ च्या १ल्या तिमाहीच्या कामगिरीचा सारांश

·        .२०२२च्या १ल्या तिमाहीची एकत्रित विक्री वर्षागणिक २४ने वाढली.

-   भारतातील व्यवसायाची विक्री १९ने वाढली.

-   इंडोनेशियातील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयात ने आणि स्थिर चलनाच्या परिभाषेत ०ने वाढली.

-   आफ्रिकाअमेरिका आणि मध्यपूर्वेतील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयांमध्ये ५९वाढली आणि स्थिर चलन परिभाषेत ६०ने वाढली.

-   लॅटिन अमेरिका आणि सार्कमधील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयात २६ने वाढली आणि  आणि स्थिर चलन परिभाषेत ४८ने वाढली.

·         .२०२२च्या १ल्या तिमाहीचे एकत्रित स्थिर चलन वर्षागणिक ईबीआयटीडीए २९ने वाढले

·          आर्थिक वर्ष २०२२च्या १ल्या तिमाहीतील संकलित निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींशिवाय आणि एकदाच करावयाच्या बाबींशिवाय३८ने वाढला.

अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका यांचे भाष्य

२०२२च्या १ल्या तिमाहीतील व्यवसायाच्या कामगिरीवर भाष्य करताना जीसीपीएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचलिका निसाबा गोदरेज म्हणाल्या:

या वर्षाची सुरुवात जोरदार झालीज्यात दोन अंकी फायदेशीर विक्री वृद्धी झालीएकत्रित विक्री २४ने वाढली आणि ईबीआयटीडीए २९ने वाढलेएकत्रित विक्रीवरील आमचे २ वर्षांचे सीएजीआर ११होते आणि ईबीआयटीडीए १५होते.

होम केअर आणि पर्सनल केअर संवर्गामध्ये आमची दोन अंकांची मजबूत विक्री वृद्धी झालीहोम केअर १४आणि पर्सनल केअर मध्ये २९ने वाढ झाली. होम केअर आणि पर्सनल केअरमधील उपश्रेणींमध्ये व्यापक आधारित वाढ दिसून आली.

भौगोलिक स्तरावर विचार करताभारतातील व्यवसाय १९ने वाढलाआफ्रिकाअमेरिका आणि मध्यपूर्व देशातील आमच्या व्यवसायाने त्याची मजबूत वृद्धीची गती चालूच ठेवलीज्यात भारतीय रुपयांमध्ये ५९ने आणि स्थिर चलनाच्या परिभाषेत ६०% ने वृद्धी होत आहेआमच्या इंडोनेशियातील व्यवसायाने भारतीय रुपयांमध्ये १वृद्धी नोंदवलीतर स्थिर चलनाच्या परिभाषेत सांगायचे तर एकसमान (फ्लॅट) वर त्याची वृद्धी स्थिर राहिली.

पुढे जातज्यासाठी मागणी आहे अशा होम केअर अँड पर्सनल केअर - घरगुती कीटकनाशकेपर्सनल वॉश अँड हायजीन आणि हेअर केअर यांवर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवलेले आहेआमच्याकडे ग्राहककेंद्री नवकल्पनांचा ओघ आहे आणि आम्ही वेगवेगळ्या किमतींच्या संपूर्ण पोर्टफोलिओवर काम करीत आहोत त्याचवेळीआम्ही आमच्या पुरवठासाखळीचे आणि वितरण जाळ्याचे प्रचालन मजबूत करीत आहोतआम्ही डिजिटल क्षमतांचा आणि ई-कॉमर्स व केमिस्ट यांसारख्या नवीन चॅनेल्सचाही उपयोग करून घेत आहोत.

आम्हाला असा विश्वास वाटतो की२०२२ या आर्थिक वर्षात वृद्धीच्या संधींच्या जोरावर आम्ही शाश्वतनफादायक विक्रीची वृद्धी आमच्या सर्व पोर्टफोलिओजमध्ये चालूच ठेवूज्या अपवादात्मक चपळतेने आणि लवचीकतेने आमची टीम सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये कोविड-१९च्या आव्हानातूनही मार्ग काढीत आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो - ज्यामुळे पुरवठा साखळी अखंड राहते आणि ग्राहकांच्या बदलत्या वर्तनाला प्रतिसाद दिला जातोगोदरेजने घालून दिलेल्या आदर्शांनुसार वाटचाल करीत राहून लोकांची आणि समुदायांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करीतच राहू.

व्यवसायावर दृष्टिक्षेप - भारत

कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये

·         २०२२च्या १ल्या तिमाहीत भारतातील विक्रीत १९ने वाढ होऊन १,६२१ कोटी रुपये झाली (२ वर्षांच्या सीएजीआरची १२%); व्हॉल्यूम्स १५ने वाढली

·         २०२२च्या १ल्या तिमाहीत ईबीआयडीटीए १५ने वाढून ते ४२५ कोटी रुपये झाले

·         २०२२च्या १ल्या तिमाहीतएकाच वेळी करावयाच्या बाबींव्यतिरिक्तचा नफा १३ने वाढून तो ३२५ कोटी रुपये झाला.

संवर्गनिहाय पुनरावलोकन

होम केअर

होम केअरमध्ये २१ची मजबूत वृद्धी झाली.

घरगुती कीटकनाशकांच्या बाबतीत आम्ही दोन अंकांची मजबूत वृद्धी नोंदवलीप्रिमिअम फॉरमॅट्समध्ये (एअरसोलइलेक्ट्रिक आणि नॉन-मॉस्क्विटो पोर्टफोलिओआणि बर्निंग फॉरमॅट्समध्ये आम्ही विस्तृत कामगिरी केलीबेकायदेशीर अगरबत्तीला प्रतिसाद म्हणून आम्ही महाराष्ट्रात जंबो फास्ट कार्ड बाजारात आणलेहे संवर्ग मॉस्क्विटोज्च्याही पुढे नेऊन आणि आमच्या पर्सनल रिपेलंट्स रेंजची व्याप्ती वाढवून आमच्या प्रमुख धोरणांना मजबूत करणे चालूच ठेवू.

एकूणच सर्व संवर्गांमध्ये त्याच्या ऐच्छिक स्वरूपामुळे त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असतानाच एअर फ्रेशनर्समध्ये क्रमाक्रमाने सुधारणा होणे चालूच राहिलेकोविड 19च्या दुसऱ्या लाटेमुळे होम हायजीन उत्पादनांसाठी भरपूर मागणी नोंदवली गेली.

पर्सनल केअर

पर्सनल केअर उत्पादनांमध्ये १७ची वृद्धी झाली.

पर्सनल वॉश आणि हायजीनने वेग कायम ठेवलाव दोन अंकी मजबूत विक्री वृद्धी केली. वृद्धीला चालना देण्यासाठी मायक्रो-मार्केट उपक्रम सुरू ठेवल्याने आम्ही आमचा बाजारपेठेतील हिस्सा मिळविणे कायम ठेवलेकिमतीत काही अंशी वाढ करून आम्ही मोठ्या खर्चाचा बोजा कमी करणे चालूच ठेवलेले आहे

हेअर कलर्सने कमी आधारावर (लो बेस) दोन अंकी मजबूत कामगिरी केलीगोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमने मजबूत मार्केटिंग कँपेनच्या जोरावर चांगली कामगिरी करणे सुरू ठेवले. गोदरेज एक्सपर्ट ईझी ५ मिनिट शांपू हेअर कलरची विक्री चांगल्या प्रकारे वाढत आहे.

व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती – इंडोनेशिया

आमच्या इंडोनेशियातील व्यवसायाने स्थिर चलनाच्या परिभाषेत ०%ची विक्री वृद्धी नोंदवून कमजोर कामगिरी केली (२ वर्षांचा ३एवढा स्थिर चलन सीएजीआर). कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेमुळे आणि विपरीत मॅक्रोइकॉनॉमिक घटकांमुळे कामगिरीतील सुधारणेवर विपरीत परिणाम झालेला आहेईबीआयटीडीए मार्जिन्स वर्षागणिक २० बीपीएसने कमी झाले.

व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती - आफ्रिकाअमेरिका आणि मध्यपूर्व

आमच्या आफ्रिकायूएसए आणि मध्यपूर्वेतील समूहाने स्थिर चलन विक्रीमध्ये ६०ची मजबूत  विक्री वृद्धी नोंदवलीदक्षिण आफ्रिकेत आणि पश्चिम आफ्रिकेत आमची विक्रीची मजबूत गती कायम आहेसर्व संवर्गांमध्ये आम्हाला मजबूत कामगिरी दिसून येत आहे आणि महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गो-टू-मार्केट उपक्रम सुरू केलेले आहेतईबीआयटीडीए मार्जिन वर्षागणिक ११७० बीपीएसने वाढलेस्केल लिव्हरेज आणि खर्चात बचत करण्याच्या उपक्रमांमुळे घडून आले.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस्विषयी

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस्‌ ही एक अग्रगण्य उदयोन्मुख विपणन कंपनी आहे२४ वर्षांच्या तरुण गोदरेज समूहाचा एक हिस्सा म्हणून विश्वासप्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांच्या प्रति असलेला आदर यांच्या मजबूत मूल्यांच्या पायावर उभारेला वारसा आम्हाला सुदैवाने लाभलेला आहेत्याचवेळी आम्ही वेगाने प्रगती करीत आहोत आणि आमच्या अपेक्षा उत्कंठावर्धक आणि महत्त्वाकांक्षी आहेत.

आज आपल्या समूहाला जागतिक पातळीवर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये १. बिलिअन ग्राहकांचा आश्रय लाभत आहेसर्वात मोठ्या घरगुती कीटकनाशकांच्या आणि हेअर केअर कंपन्यांच्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आमचा वरचा क्रमांक आहेघरगुती कीटकनाशकांच्या बाबतीत आम्ही भारतात अग्रेसर आहोतइंडोनेशियात दुसऱ्या क्रमांकावर आणि आफ्रिकेत आमचे कार्यक्षेत्र विस्तारत आहोतआम्ही आफ्रिकन वंशाच्या स्त्रियांच्या हेअर केअर उत्पादनांच्या गरजा पूर्ण करण्यात अग्रेसर आहोतभारतात आणि सब-हारन आफ्रिकेत आणि लॅटिन अमेरिकेतील अग्रगण्य कंपन्यांमध्ये हेअर कलर कंपन्यांमध्ये क्रमांक एकवर आहोतभारतात साबणांच्या बाबतीत आमचा क्रमांक दुसरा आहे आणि एअर फ्रेशनर्स आणि वेट टिश्यूमध्ये इंडोनेशियात क्रमांक एकवर आहोत.

परंतु आमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे कीमजबूत आर्थिक कामगिरी आणि नवनवीन कल्पनाअत्यंत लोकप्रिय उत्पादनेअसूनही आम्ही एक उत्तम कंपनी आहोतआमच्या समूहाच्या सुमारे २३ टक्के प्रमोटर होल्डिंग कंपन्या ह्या ट्रस्टने धारण केलेल्या आहेतजे पर्यावरणआरोग्य आणि शिक्षण यांमध्ये गुंवतणूक करतातआमच्या ‘गुड अँड ग्रीन’ दृष्टिकोनाच्या माध्यमातून वेगळेपणा दाखवून देण्यासाठीअधिक समावेशक आणि हरित भारत निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या उत्कट भावना आणि हेतू यांना एकत्र आणीत आहोत.

या सर्वाच्या केंद्रस्थानी आहे ती आमची बुद्धिमान टीमचपळ आणि उच्च कामगिरीच्या संस्कृतीसह, कार्यसंस्कृतीस प्रोत्साहन देणारे कार्यस्थळ निर्माण करण्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतोआमच्या टीममधील विविधता ओळखून विविधतेचा सन्मान करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत

अस्वीकृती:

वर व्यक्त केलेली आर्थिक स्थिती ही व्यवसायाच्या वास्तविक आर्थिक कामगिरीचे प्रतिबिंब दर्शविण्यासाठी कळविलेल्या आर्थिक स्थितीपेक्षा वेगळी असू शकतेह्या संज्ञापनातील काही विधाने लागू असलेल्या कायद्यांच्या आणि विनियमांच्या अर्थानुसार कदाचित आशावादी असू शकतातयात व्यक्त केलेल्या किंवा अध्याहृत निष्कर्षांपेक्षा वास्तवातले निष्कर्ष हे मोठ्या प्रमाणावर वेगळे असू शकतातकंपनीच्या विकासावर परिणाम करू शकतील अशा महत्त्वाच्या घडामोडींमध्ये उद्योगाच्या रचनेतील बदलभारतातील आणि परदेशातील राजकीय आणि आर्थिक वातावरणकरविषयक कायदेआयात करन्यायालयीन खटले आणि कामगार संबंध यांमध्ये झालेले मोठे बदल यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO