बाजिंद’ म्हणजे काय?; उभ्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न, Google च्या आकडेवारीवरून स्पष्ट

मन झालं बाजिंद’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर गुगलवर 'बाजिंदया शब्दाचा नेमका अर्थ कायहे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘मन झालं बाजिंद’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेया मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहेया मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहेपण मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक मात्र बुचकळ्यात पडले आहेतत्यांना मालिकेच्या नावातील ‘बाजिंद’ या शब्दाचा अर्थ मात्र माहिती नाहीयेउभा महाराष्ट्र गुगलवर ‘बाजिंद’ या नावाचा नेमका अर्थ कायहे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो २९ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आलाबघता बघता या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालापण प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक गुगलवर ‘बाजिंद’ शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘बाजिंद अर्थ’, ‘बाजिंद Meaning’, ‘बाजिंदचा अर्थ’, ‘बाजिंद म्हणजे काय?’, ‘बाजिंदी अर्थ’ या टर्म्स गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये दिसून येत आहेत.

सायंकाळी म्हणजेच जेव्हा सर्वजण टीव्हीसमोर बसून आपल्या आवडत्या मालिका पाहत असतात तेव्हापासून ‘बाजिंद’ शब्दाबद्दलचा सर्च वाढताना दिसतोसामान्यपणे पुढील चार तासांमध्ये म्हणजेच रात्री साडेअकरापर्यंत सर्चचे हे प्रमाण वाढतच जातेसाडेअकराला सर्वाधिक लोक ‘बाजिंदबद्दल सर्च करत असतातविशेष म्हणजे त्यानंतर ‘बाजिंदबद्दलच्या सर्चमध्ये पुन्हा घट होते आणि पुन्हा पुढील दिवशी साडेसातच्या आत हा सर्च ग्राफ वर गेलेला पहायला मिळतोम्हणजेच जेव्हा जेव्हा मालिका बघताना जाहिरात लागते तेव्हा लोक ‘बाजिंदचा अर्थ काय आहे हे गुगलवर सर्च करताना दिसतात.

मन झालं बाजिंद’ या मालिकेत बाजिंद हा शब्द मालिकेतील नायक रायासाठी वापरण्यात आला आहेया शब्दाचा अर्थ इथे जिद्दी असा होतोमालिकेत राया हा अतिशय जिद्दी दाखवण्यात येणार आहेपरंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारामाझं तुझं  करता प्रेमाची उधळण करणारात्याच्या कामाचा पसाराही मोठा आहेअसा बाजिंद नायक राया आहेतर मालिकेतील नायिका कृष्णा ही मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेलीसी.होण्याचं स्वप्नं पाहणारीहुशारसावरून घेणारीमांडणी करणारीसंयमीविचार करून कृती करणारी दाखवण्यात येणार आहे.

मन झालं बाजिंद’ या मालिकेत पहिल्यांदाच राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहेपिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीकहा मांगल्याचासमृद्धीचा रंग आहेआपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतोआत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतोया पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहेया मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेतया मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO