कसा थांबवेल लतिका अभिमन्यूचा अपमान !

५ ऑगस्ट रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर 

मुंबई ४ ऑगस्ट, २०२१ : कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये अभिमन्यू आणि लतिकाच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचं काही नावं घेत नाहीये. दोन कुटुंबात वाढत असलेल्या कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून  मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारतून तिला बाहेर काढलं. यासगळ्याची अभिमन्युला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते आहे. लतिकाच्या कर्तृत्वाबद्दल तिचा मोठा सत्कार होणार आहे. आणि हा सत्कार अभिमन्यूच्या हस्ते पार पडणार आहे. पण, जमा झालेल्या बायकांनी अभिमन्यूविरुध्द आवाज उठवला. बायकोला साभार परत करणार असं म्हणून आता सत्कार कसा करणार आणि त्याच्या तोंडाला काळ फासण्यासाठी पुढे येतात. एकीकडे लतिकाचा होणार सत्कार आणि दुसरीकडे अभिमन्यूवर ओढवलेले संकट नक्की काय होणार ? लतिका कसा थांबणार अभिमन्यूचा होणारा अपमान बघा सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या ५ ऑगस्टच्या म्हणजेच उद्याचा भागात रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable