‘बॉलीवूड धमाका’चे प्रेक्षकांकडून जोरदार ‘वेलकम’!! 

अस्सल फिल्मी नजराणा घेऊन शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीने आणलेला ‘बॉलीवूड धमाका’ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. ‘बॉलीवूड धमाका’ मधील ‘वेलकम’ (‘एक झिंगाट कॉमेडी’) या मराठी डब चित्रपटासाठी करण्यात आलेल्या सोशल माध्यमांवरील प्रसिद्धीला २ कोटी ८० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. गाजलेल्या विनोदी बॉलीवूडपटांचा आस्वाद आपल्या मराठी भाषेत प्रेक्षकांना घरबसल्या घ्यायला मिळत असल्याने हास्याच्या मेजवानीचा दुप्पट आनंद प्रेक्षकांना घेता येतोय.

 

या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आलेले वेगवेगळे व्हिडिओ, रील सोशल माध्यमावर चांगलेच गाजले. चित्रपटातील गाजलेल्या संवादाने आणि भन्नाट सीन्सने तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओजने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली. सोशल माध्यमांवर मिळालेले व्ह्यूज लक्षात घेता शेमारू मराठीबाणा प्रस्तुत ‘बॉलीवूड धमाका’ मधील पहिला सिनेमा ‘वेलकम’ (‘एक झिंगाट कॉमेडी’) चे प्रेक्षकांनी दणक्यात स्वागत केले आहे.

 

वेलकम (‘एक झिंगाट कॉमेडी’) या पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘बॉलीवूड धमाका’ मधील आगामी ‘फिर हेराफेरी (‘पुन्हा गडबड पुन्हा गोंधळ’) आणि ‘भागमभाग‘ ('राडा झाला रे’) या दोन चित्रपटांबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. रविवार ८ ऑगस्टला फिर हेराफेरी (‘पुन्हा गडबड पुन्हा गोंधळ’) आणि रविवार १५ ऑगस्टला ‘भागमभाग‘ ('राडा झाला रे’) चित्रपट दुपारी १२.०० वा. आणि सायं ७.०० वा. शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येतील.

हास्याचा व मनोरंजनाचा तुमचा पहिला डोस चुकला असेल तर पुढच्या सलग दोन रविवारी उपलब्ध होणारा मनोरंजनाचा ‘अस्सल फिल्मी डोस’ अजिबात चुकवू नका.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable